Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू, पती गंभीर जखमी

Samruddhi Mahamarg News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
 Samruddhi Mahamarg Accident News
Samruddhi Mahamarg Accident NewsSaam TV
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे परिवहन विभागाने महामार्गावरील अपघात कमी करण्याची गांधीगिरी सुरू केली असताना दुसरीकडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एका कारचा भीषण अपघात झाला आहे.

भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

 Samruddhi Mahamarg Accident News
Jalna Crime News: मला तुझी बायको खूप आवडते, तरुणाचा थेट साडूला फोन; मेहुणीसोबत केलं संतापजनक कृत्य

अपघात नेमका कसा झाला?

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त पती-पत्नी हे शिर्डी वरून नागपूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समृद्धी महामार्गावरील बुलडाण्याजवळ एका फ्लाय ओव्हरच्या खाली एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. ट्रकचे चालक आणि वाहक हे स्वतःच्या जेवणासाठी स्वयंपाक करण्यासाठी थांबले होते.

दरम्यान, भरधाव वेगात येणारी क्रेटा कार फ्लाय ओव्हरजवळ आली असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट ट्रकला पाठीमागून धडकली. या भयंकर घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला.  (Breaking Marathi News)

 Samruddhi Mahamarg Accident News
Crime News: ज्याच्याशी होणार होतं लग्न त्यानेच केला घात; तरुणीला हॉटेलात बोलावलं अन्...

तर कारचालक पती हा गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोघांचीही अद्याप ओळख पटलेली नाही. विशेष म्हणजे समृद्धी महामार्गावर वाहने थांबवण्यास मनाई आहे.

तरीही अनेक ट्रकचालक कुठलीही भीती न बाळगता  समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg)  गाडी थांबवून स्वयंपाक करून आपल्या जेवणाची व्यवस्था करत असतात. अशा प्रकारचा हा तिसरा अपघात असल्याने पोलिसांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जातेय.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com