Salapur Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Salapur News: तरुणी तलावाजवळ आली अन् थेट पाण्यात उडी घेतली; सोलापूर शहरातील खळबळजनक घटना

Salapur Breaking News : सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जीव देण्यासाठी एका तरुणीने छत्रपती संभाजी महाराज तलावात उडी घेतली.

Satish Daud

सोलापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जीव देण्यासाठी एका तरुणीने छत्रपती संभाजी महाराज तलावात उडी घेतली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर बोटिंग क्लबमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या.

वेळीच सतर्कता दाखवत तरुणांनी जीव देणाऱ्या तरुणीचे प्राण वाचवले. या संपूर्ण घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वैष्णवी असं तरुणीचं नाव आहे. तिने नेमकं इतकं टोकाचं पाऊल उचलण्याचा का प्रयत्न केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावाजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास एक तरुणी उभी होती. अचानक या तरुणीने पाण्यात उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील लोकांनी आरडाओरड सुरू केली.

तरुणीला वाचवण्यासाठी बोटिंग क्लबमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या. जुबेर शेख, इलियास शेख, श्रीनिवास परदेशी यांनी वेळेचे भान ठेवून तरुणीला वाचवलं. हा संपूर्ण थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

Central Railway : मुंबईत पावसाची जोरदार हजेरी! मध्यरेल्वे अर्धा तास उशीराने; प्रवाशांची तारांबळ | VIDEO

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठी यांचे ७ बेस्ट कॉमेडी चित्रपट एकदा नक्की बघा

जय महाराष्ट्र! टेस्लाचा पहिला मान मराठीला, BKC मधील शोरूमची पाटी मराठीत

Monsoon Red Alert : पुढील ४ तास धोक्याचे, पुणे-साताऱ्याला रेड अलर्ट, अतिजोरदार पाऊस कोसळणार!

SCROLL FOR NEXT