नदीच्या प्रवाहात पडलेल्या मुलासाठी तरुणी ठरली देवदूत; मुलगा सुखरुप
नदीच्या प्रवाहात पडलेल्या मुलासाठी तरुणी ठरली देवदूत; मुलगा सुखरुप विनोद जिरे
महाराष्ट्र

नदीच्या प्रवाहात पडलेल्या मुलासाठी तरुणी ठरली देवदूत; मुलगा सुखरुप

विनोद जिरे

बीड - अंबाजोगाईमध्ये Ambajogai आई-वडिलांसोबत आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिर, बुट्टेनाथ डोंगर परिसरात वाहत्या नद्या फिरण्यासाठी आलेल्या 10 वर्षीय मुलगा नदीच्या पात्रात उतरला. मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मुलगा पाण्यात अडकला. आई- वडिलांनी आरडा ओरडा केला पाण्याचा अंदाज नसल्याने वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सुलभा सोळंके या युवतीने प्रसंगावधान बाळगुन, स्वतः पाण्यात उतरून इतरांच्या मदतीने, त्या बालकाचे प्राण वाचविले. हा प्रकार काल वाण नदीच्या पात्रात घडला.

हे देखील पहा -

अंबाजोगाई व परिसरात मोठा पाऊस Rain झाल्याने आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिर, बुट्टेनाथ डोंगर परिसरात वाहत्या नद्या, धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सेल्फी काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. या ठिकाणी लहान मुलांना घेऊन नागरिक गर्दी करत असल्याने अशा अपघाताच्या घटना घडत आहेत.

बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नदी नाले ओढे तसेच धबधबे ओसंडून वाहत आहेत. यातच या ठिकाणी पाहण्यासाठी हौशी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यावेळी धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरून सेल्फी काढनं जीवावर बेतू शकतं. याचं भान न ठेवता बिनधास्त उतरत असल्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पर्यटन स्थळाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT