Parbhani News Saam Tv
महाराष्ट्र

Parbhani News: घरात लगीनघाई सुरु, मुलाने स्वतःच्या मोबाइलवरून केला व्हिडियो व्हायरल अन् मग...

Crime News: जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथील मन हेलावून टकणारी घटना...

राजेश काटकर

Parbahni Crime News: स्वतःच्या मोबाइलवरून व्हिडीओ व्हायरल करून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन एका 27 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी नऊ वाजता जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे येथे घडली आहे. (Latest Marathi News)

माऊली जवडे (27, रा. चिंचोली काळे, ता. जिंतूर), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. चिंचोली काळे येथील माऊली याने गावातील तीन जणांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे, असा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदरील घटनेची माहिती बोरी पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, पोलीस उपनिरीक्षक खिल्लारी यांनी घटनास्थळी भेट दिली. सदरील तरुणाचा मतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केला. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. के. पवार यांनी तपासणी करून त्यास मयत घोषित केले. (Parbhani News)

माऊल या तरुणाचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले होते त्यातच ही घटना घडली. या घटनेमुळे आरोपीवर कारवाई करावी, या मागणीसाठी बोरी पोलीस ठाण्यात चिंचोली काळे येथील ग्रामस्थांनी रविवारी मोठी गर्दी केली होती. मयत तरुणाच्या पश्चात आई, वडील, चार बहिणी असा परिवार आहे. तर मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी काही काळ शवविच्छेदन रोखले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT