आधी केला प्रेम विवाह नंतर सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

आधी केला प्रेम विवाह नंतर सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

सासरच्या छळाला कंटाळून २ विवाहित तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव आणि शिरसोली या गावात घडली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : सासरच्या छळाला कंटाळून २ विवाहित तरुणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव आणि शिरसोली या गावात रविवारी घडली आहे. जळगावमधील पंकज उखर्डू खाचणे (वय- २७) वेल्डिंग काम करत होता. ४ वर्षांपूर्वी त्याने प्रेमविवाह केला होता. त्याला दीड वर्षांचा मुलगा देखील आहे. पंकजने मृत्यूअगोदर २ पानांची सुसाइड नोट लिहिली आहे.

हे देखील पहा-

या दांपत्यामध्ये चांगलाच वाद होत होता. त्यामुळे २० दिवसांपासून पत्नी माहेरी गेली होती. ती फोन देखील उचलत नव्हती. कंटाळून पंकजने गळफास घेतला. सासरचे लोक छळ करत असल्याची सुसाइड नोट लिहून आणि व्हाॅट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून अमोल प्रकाश चिंचोरे (वय- २७) याने शिरसोली गावात घरामध्येच पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली.

६ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. या दांपत्यास तेजस्विनी (वय- ६) आणि वेदांत (दीड वर्ष) अशी दोन अपत्ये आहेत. दरम्यान, ५ वर्षांपासून पती- पत्नीचे नेहमी भांडणे होत होते. सध्या दिवाळीनिमित्त पत्नी माहेरी गेली आहे. त्यामुळे त्याने आपले जीवन संपवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT