Winter Session: अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्द

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सूरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गदारोळाने सुरु
Winter Session: अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्द
Winter Session: अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्दSaam Tv
Published On

नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सूरूवात झाली असून, अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात गदारोळाने सुरु झाली. त्यानंतर सभागृहाचे सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज १२ पर्यंत स्थगित केले आहे. विरोधकांनी गदारोळ सूरू करताच सभापतींनी सर्व खासदारांना संसदेच्या प्रतिष्ठेचा मान ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी देखील विरोधक शांत होत नसल्याचे पाहता त्यांनी कामकाज स्थगित करण्याचा निर्णय हाती घेतला आहे.

हे देखील पहा-

गेली अनेक महिने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून लागू करण्यात आलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती.

मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शेतकरी जे एक वर्ष लढले, लाठी मार खाल्ला,खलिस्तानी दहशतवादी आरोप झाला. मोठा संदेश गेला देश एकत्र आला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो,असे सांगत मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषण केली,

Winter Session: अखेर कृषी कायदे लोकसभेत रद्द
ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या मानधनात वाढ; 500 हून अधिकांना मिळणार लाभ

हे कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले. अखेर शेतकऱ्यांच्या या आंदोलनापुढे केंद्र सरकार नमले व आजपासून हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदी यांनी केली.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com