25-Year-Old Actor Sachin Chandwade Ends Life Saam
महाराष्ट्र

सिनेमा रिलिजच्या तोंडावर मराठी अभिनेत्यानं आयुष्य संपवलं; २५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

25-Year-Old Actor Sachin Chandwade Ends Life: २५ वर्षीय अभिनेता आणि सॉफ्टवेअर इंजिनीअरने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

Bhagyashree Kamble

  • अभिनेत्यानं आयुष्य संपवलं.

  • घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • आत्महत्याचं कारण अस्पष्ट.

जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे. २५ वर्षीय होतकरू अभिनेत्यानं गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. सचिन गणेश चांदवडे (वय वर्ष २५) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो अभिनेता होता. यासह पुण्यातील आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही कार्यरत होता. तरूणाच्या मृत्यूनंतर उंदिरखेडे गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

सचिनने राहत्या घरात आयुष्य संपवलं. गळफास लावून आत्महत्या केली. तरूणानं आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाने त्याला तातडीने रूग्णालयात नेले. तरूणाची प्रकृती बिघडल्यानं त्याला तातडीने धुळे येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. २४ ऑक्टोबर रोजी तरूणानं मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

सचिन उत्तम अभिनेता होता. तो एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. तसेच पुणे येथील आयटी पार्कमध्ये नोकरीही करीत होता. त्याला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यानं अभिनयात नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला. मुंबई आणि पुण्यात तरूणाने काही चित्रपटात अभिनयाचे काम केले होते.

सचिन असुरवन चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाचं पोस्टर त्यानं सोशल मीडियात शेअर केली होती. असुरवन चित्रपटाव्यतिरिक्त सचिन जमतारा सिझन २ यातही दिसला होता. विषय क्लोज या चित्रपटातही त्यानं काम केलं होतं. सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि अभिनयाव्यतिरिक्त सचिन ढोल ताशा पथकातही सक्रिय होता. दरम्यान, सचिनने उचललेल्या टोकाचं पाऊलमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Crime News : भरदिवसा व्यावसायिकाचं अपहरण, सराफाला नग्न करून मारहाण, ५० किलो चांदी, सोनं आणि मोठी रक्कम लुटली

Maharashtra Politics : निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांना मोठा धक्का; बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Tulsi Vivah Story: तुळशी विवाह का करतात? काय आहे नेमकी प्रथा?

Maharashtra Live News Update: पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली हजारो लिटर पाणी वाया

Maharashtra Politics: मविआमध्ये बिघाडी? काँग्रेसचा स्वबळाचा नारा, अहिल्यानगरच राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT