beed news, yogesh kshirsagar, mla sandip kshirsagar, beed bazar samiti election saam tv
महाराष्ट्र

Beed APMC Election : सावध व्हा ! बाजार समितीला ते गुटखा, जुगार अन् वाळूचा अड्डा बनवतील, याेगेश क्षीरसागरांची आमदारांवर टीका

आगामी काळात सर्व कार्यकर्ते आपल्याकडे येतील असेही याेगशे क्षीरसागर यांनी नमूद केले.

विनोद जिरे

Yogesh Kshirsagar News : आमदार म्हणतात आमच्या घरातील एकही उमेदवार नगरपालिका निवडणूक लढवणार नाही. मात्र आता यांच्या घरात राहिलंच कोण आहे ? जो नगरपालिका निवडणूक लढेल. कुणाला सोडलंचं नाही यांनी त्रास द्यायचा, मग यांच्या सोबत कोण कसं राहील अशी टीका नगरसेवक याेगेश क्षीरसागर (yogesh kshirsagar) यांनी आमदार संदीप क्षीरसागर (mla sandip kshirsagar) यांच्यावर केली. (Maharashtra News)

नगरसेवक योगेश क्षीरसागर हे बीडमध्ये बाजार समिती निवडणूकीच्या (beed bazar samiti election) जाहीर कार्यक्रमात बोलत होते. मी अगोदर पासून म्हणत होतो, हे चांगले नाहीत. आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत असं म्हणत नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांवर टीकास्त्र सोडत धक्काबुक्कीच्या व्हिडिओवर जाहीर भाष्य केलं.

जर यांच्या ताब्यात बाजार समिती गेली तर ते हमालांना देखील सोडणार नाहीत. हमालांकडून देखील 50 रुपये का होईना टक्केवारी घेतील असा सणसणीत टाेला योगेश क्षीरसागर यांनी भाऊ संदीप क्षीरसागरांना लगावला आहे.

ते पुढे म्हणाले, की यांच्यासोबत जे आहेत ते जुगार, गुटखा, वाळूच्या धंद्यावाल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत यांच्या बाहेरच्या गोडाऊनवर कारवाया झाल्या. मात्र यांच्या ताब्यात जर बाजार समिती गेली तर मग बाजार समितीचे एक नंबरचे गोडाऊन गुटख्यासाठी, दोन नंबरचा गोडाऊनमध्ये जुगार अड्डा आणि तीन नंबरच्या गोडाऊनमध्ये वाळूचा स्टॉक असं हे करतील.

त्यामुळे व्यापारी आणि हमाल बांधवांना जगणं मुश्किल होईल असं म्हणत योगेश क्षीरसागर यांनी भाजप, शिंदे गट, ठाकरे गट यांनी एकत्रित मिळून केलेल्या पॅनलवर टीकास्त्र सोडले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vengurla Tourism: समुद्राची शांतता, किल्ल्यांचा इतिहास, मंदिरांची भक्ती... हे सगळं एकाच ट्रिपमध्ये पाहायचंय? मग बॅग भरा आणि चला वेंगुर्ल्याला!

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sushil Kedia: ठाकरे काय करायचं बोल? राज ठाकरेंना टॅग करत उद्योजक सुशील केडियांची धमकी| VIDEO

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

SCROLL FOR NEXT