Ahmednagar News Sachin Jadhav
महाराष्ट्र

Ahmednagar News: अंत्यसंस्कार झालेले ३ मृतदेह पुन्हा बाहेर काढले; यवत हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट

अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav

Yavat News Update: अहमदनगरच्या यवत हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे. या घटनेत एकाच दिवशी भीमा नदी पात्रात ७ मृतदेह सापडले. हे मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अंत्यविधी केलेले सात पैकी तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेने पुन्हा एकदा या भयावह घटनेला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. ( Ahmednagar Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातील एका टीमने हे अंत्याविधी झालेले मृतदेह बाहेर काढले आहेत. तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करायचे असल्याने तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल केले गेले आहेत. रुग्णालयाचे एक विशेष पथक या तिन्ही व्यक्तींचे शवविच्छेदन करणार आहे. या सात जणांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांचे एकूण ५ पथक या घटनेचा छडा लावण्यासाठी कार्यरत आहेत.

आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात अशोक कल्याण पवार, शाम कल्याण पवार, शंकर कल्याण पवार, प्रकाश कल्याण पवार, कांताबाई सर्जेराव जाधव यांच्यावर संशय असल्याने त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी किती फायदेशीर?

भाजप स्वबळावर लढणार, CM फडणवीसांच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान

Maharashtra News Live Update: 7 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर कोकणवासीयांचा परतीचा प्रवास

लालबागच्या राजाच्या मंडपात अचानक शॉर्टसर्किट; मोठ्या ठिणग्यांनी भाविकांमध्ये घबराट|VIDEO

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा हादरा! बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख ठरली

SCROLL FOR NEXT