TRAGIC DEATH OF 14-MONTH-OLD DUE TO ELECTRIC SHOCK FROM COOLER IN YAVATMAL Saam Tv
महाराष्ट्र

Yavtmal : ह्रदयद्रावक! खेळता खेळता कुलरजवळ गेला, पाण्यात हात घालताच शॉक लागून १४ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Yavtmal News : यवतमाळ जिल्ह्यातील शिरोली गावात कुलरमधील विद्युत प्रवाहाचा शॉक लागून १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Alisha Khedekar

  • यवतमाळमध्ये कुलरमुळे १४ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

  • खेळता खेळता मुलाला बसला शॉक

  • कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच मृत्यू

  • लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित

यवतमाळ - संजय राठोड

Yavtmal 14 Month Baby Death News यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील शिरोली गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून अवघ्या १४ महिन्यांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वराज सुरज उले असे या मृत मुलाचे नाव असून या घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळच्या सुमारास घडली. स्वराजची आई अंगणात सडा-सारवण करण्याच्या कामात व्यस्त होती, तर घरातील इतर सदस्य झोपेत होते. त्या दरम्यान स्वराज अंगणात एकटाच खेळत होता. घरातील कुलर सुरू असल्याने त्यात पाणी भरलेले होते. खेळता खेळता स्वराज कुलरजवळ गेला.

कुतूहलापोटी त्याने कुलरच्या पाण्याच्या टाकीत हात टाकला. मात्र, त्याच क्षणी कुलरमध्ये आलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार शॉक बसला. घटना घडताच क्षणी कुटुंबीयांनी तातडीने कुलर बंद केला आणि स्वराजला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान, लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विद्युत उपकरणे वापरताना योग्य काळजी घेणे, वायरिंगची नियमित तपासणी करणे आणि उपकरणे सुरक्षित स्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. स्वराजच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT