yavatmal chaatari zila parishad school  Saam Tv
महाराष्ट्र

Zila Parishad School: यॅक यॅक! शाळेतील पोषण आहाराच्या चॉकलेटमध्ये अळ्या; यवतमाळमधील धक्कादायक घटना

yavatmal chaatari zila parishad school : यवतमाळमधील उमरखेड तालुक्यातील चातारी जिल्हा परिषदेच्या शालेय पोषण आहारात अळ्या सापडला आहेत. मिलेट्सच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने पालकांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केलीय.

Bharat Jadhav

यवतमाळ : जिल्ह्यात शालेय पोषण आहारासंदर्भात धक्कादायक बातमी समोर आलीय. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असणाऱ्या चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात आहे. या आहाराच्या चॉकलेटचे वितरण करण्यात येत असून या मिलेट्स चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्यात.

मिलेट्स चॉकलेटमध्ये अळ्या आढळून आल्याने जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या पौष्टिकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत होत आहेत.दरम्यान जस्ट युनिर्व्हसल कंपनीकडून पोषण आहार जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरवला जातो. परंतु यवतमाळमधील पोषण आहारात अळ्या आढळून आल्याने कंपनीच्या गुणवत्तेवर प्रश्न केले जात आहेत. प्रशासन या कंपनीवर काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चातारी प्राथमिक मुलींची कन्या शाळेत मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वाटपाच्या सूचना दिल्या होत्या. काही पालकांनी मिलेट्सच्या चॉकलेट घरी नेले. यातील काही पालकांनी नेलेल्या चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या आळ्या असल्याचे आढळून आलं. त्यानंतर सर्व पालकांनी मुख्याध्यापकांना हे चॉकलेट परत आणून दिले.

दरम्यान जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ३० ग्रॅम प्रति याप्रमाणे रागी, जवार आणि बाजरा या तीन प्रकारचे चॉकलेट विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये शाळेत ठेकेदारांनी पोहोचवले होते माहिती प्राथमिक स्वरुपात मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

ठाकरेंच्या युतीनंतर काल बेफाम नाचले, आज मनसेच्या प्रदेश सरचिटणीसने कमळ घेतलं|VIDEO

Blood Cancer: शरीरावर वारंवार दिसतात ही 2 लक्षणं, असू शकतो जीवघेणा ब्लड कॅन्सर, आताच व्हा सावध, अन्यथा...

नाशिकमध्ये सोलापूर पॅटर्न, 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्याच्या भाजप प्रवेशाला विरोध, कारण काय? VIDEO

Sayali Sanjeev: मुंबई पुणे नव्हे तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शाळेत शिकलीये अभिनेत्री सायली संजीव

SCROLL FOR NEXT