न्यायाधीशाच्या वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार; युवकाची पत्नीही गंभीर! संजय राठोड
महाराष्ट्र

न्यायाधीशाच्या वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार; युवकाची पत्नीही गंभीर!

न्यायाधीशाच्या वाहनाने युवकाला उडवले २६ वर्षाचा युवक जागीच ठार तर त्याची पत्नीही गंभीर जखमी, यवतमाळ मधील दिग्रस-आर्णी रोडवरील घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : दिग्रस ते आर्णी या मार्गावर न्यायाधीशाच्या वाहनाने दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने दुचाकीवरील २६ वर्षाचा युवक जागीच ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ७ च्या सुमारास घडली आहे.

हे देखील पहा -

हा अपघात कलगाव फाट्यावर झाला असून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास महेश (गोलू) खंडु  भनक (वय २६) वर्षे हा आपल्या पत्नीसह दिग्रस येथून आपल्या गावी वाई-मेंढी येथे जात होता. प्रवासादरम्यान कलगाव फाट्यावर आर्णी कडुन दिग्रसला जात असलेल्या स्विफ्ट डिझायर एम.एच.२९.ए.आर. ५०८५ या गाडीचे चालक आणि न्यायाधीश रामकृष्ण अभ्यंकर दिग्रसकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली.

या घटनेत महेश खंडू भनक हा जागीच ठार झाला. तर, त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे हा अपघात एवढा भयंकर होता की, मृतक महेश भनक याच्या हाताचे दोन तुकडे होऊन दुसऱ्या बाजूला फेकल्या गेले. तर एक पाय पुर्णतः तुटला ! गाडी वेगात असल्याने १०० फुट दुर असलेल्या प्रवासी निवाऱ्याला जाऊन धडकली व निवाऱ्याची भिंत देखील पडलीआहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT