यवतमाळ: पुराच्या पाण्यात वाहून गेली ST... (पहा Video) Saam Tv
महाराष्ट्र

यवतमाळ: पुराच्या पाण्यात वाहून गेली ST... (पहा Video)

गुलाब चक्रीवादाळामुळे सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

उमरखेड : गुलाब चक्रीवादाळामुळे Gulab Cyclone सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भात दोन दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसात सुरु असताना त्यात प्रवास करत असताना एका एसटी चालकाने पुराच्या पाण्यातून बस काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तो प्रयत्न त्याच्या जिवावर बेतला आहे. आज सकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान नांदेडहून नागपूरला पुसदमार्गे ही बस जात होती त्यावेळेस उमरखेडपासून दोन किमी दहांगाव नाला पार करत असताना पुराच्या पाण्यात बस वाहून गेली आहे.

व्हिडीओ-

बस चालकाने पुराच्या पाण्यातून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळीच बस पाण्यात वाहून गेली. प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये साधरणमध्ये पाच जण असल्याची मिळाली होती.

सुधारित माहितीनुसार, सहा प्रवाशी पैकी दोघांना सुखरूप काढलं बाहेर तर एक प्रवाशी चा झालाय मृत्यू अजुन तिघे बेपत्ता आहे. शोध कार्य सुरूच. 4 प्रवाशी एक चालक आणि एक वाहक असे मिळून एकूण 6 जण होते बस मध्ये त्यातून 2 जिवंत बाहेर काढण्यात आले तर एक मृत्यू अवस्थे सापडला आहे. ही एसटी बस क्रमांक एमएच 14 बीटी 5018 ही बस नांदेडहून पूसदमार्ग नागपूरला निघाली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

भयंकर! अंगात कपडे नव्हते, हातात लाकडी दांडा; मनोरुग्णाच्या जीवघेण्या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT