Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Lightning Strike : वीज कडाडली अन् झाला घात; बैल चारण्यासाठी गेलेल्या तरूणाचा मृत्यू, दोघे जखमी

Yavatmal News : दुपारच्या वेळी तिघे मित्र बैल चारण्यासाठी शेतात गेले असताना अचानक पावसाला सुरवात झाली, याच वेळी विजांचा कडकडाट देखील सुरु होता. यामुळे तिघे मित्र आडोश्याला गेले होते. मात्र याच ठिकाणी वीज कोसळली

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: दुपारच्या सुमारास शेतात बैल चारण्यासाठी तरुण गेले होते. याचवेळी अचानक आभाळ दाटून आले आणि विजांचा कडकडाट देखील सुरु झाला. अशात वीज कोसळून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या वणी तालुक्यातील तेजापूर शेतशिवारात घडली आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर येथील शेतशिवारात सदरची घटना घडली आहे. यात धम्मरत्न सुधाकर भगत (वय २३) असे वीज कोसळून ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर गजानन दिवाकर कोंडेकर (वय २४) व पूनम संजय मालेकर (वय २३) हे दोन्ही गंभीर जखमी झाले आहेत. तेजापूर येथील तिघ मित्र भगत यांच्या शेतात बैल चारण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत हे तरुण थांबत असतात. 

पावसातून बचावासाठी तिघे गेले मांडवाखाली 

दरम्यान अचानक आभाळ दाटून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. पावसातून बचाव करण्यासाठी तिघे जण शेतातील मांडवाखाली जाऊन बसले. याच वेळी जोरदार आवाज होऊन मांडव्यावर वीज कोसळली. त्यात धम्मरत्न भगत हा जागीच ठार झाला. तर विजेच्या धक्क्याने गजानन कोंडेकर व पूनम मालेकर हे दोघं तरुण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. 

एकुलता एक मुलगा हिरावला 

डॉक्टरांनी धम्मरत्न भगत याला मृत घोषित केले. तर जखमी झालेले दोन्ही तरुणांना एका खाजगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. मृत धम्मरत्न भगत हा आई- वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील अर्धांगवायू या आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या मागे आई वडील व चार विवाहित बहीणी आहे. कुटुंबातील एकुलता कमावता व्यक्ती गेल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

Maharashtra Live News Update: हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी

Metro News : पुणेकरांना खुशखबर, गणेशोत्सावत मेट्रो रात्री २ वाजेपर्यंत धावणार

Cholesterol myths: किचनमधील 'या' चुका वाढवतायत तुमचं कोलेस्ट्रॉल; मनात असलेले गैरमसज आजच काढून टाका

EPF Calculator: महिन्याला ₹५००० गुंतवा अन् ३.५ कोटींचा फंड मिळवा; वाचा नेमकं कॅल्क्युलेशन

SCROLL FOR NEXT