Nagpur- Tuljapur Highway Saam tv
महाराष्ट्र

Nagpur- Tuljapur Highway : रस्त्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक; नागपूर- तुळजापूर महामार्ग रोखला

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा ते इजनी दरम्यान असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विध्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : हिवरा ते ईजनी या रस्त्यासाठी निधी मंजूर असून देखील रस्त्याचे काम होत नाही. यामुळे रस्ता (Yavatmal) करण्याच्या मागणीसाठी संतप्त विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. नागपूर- तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांनी (Rasta Roko) रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग रोखला आहे. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा ते इजनी दरम्यान असलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. यामुळे शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) याचा अधिक त्रास सहन करावा लागत असतो. शिवाय या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी रूपयांचा निधी मंजूर आहे. तरीदेखील काम सुरू न केल्याने विद्यार्थ्यांसह पालकवर्ग संतप्त झाले आहे. या करीताच आज नागपूर- तुळजापूर महामार्गावर (Nagpur Tuljapur Highway) येत रास्ता रोको आंदोलन केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लेखी आश्वासन दिले तरच हटणार 
मागील दीड तासापासून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. याठिकाणी महागांव पोलीस दाखल झाले असून विद्यार्थ्यांची समजूत काढत आहेत. मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आम्ही रस्त्यावरून उठणार नसल्याचा विद्यार्थ्यांसह पालकांचा पवित्रा घेतला आहे. परिणामी दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT