Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : यवतमाळ शहरात बनावट खाद्यतेलाची विक्री; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाड टाकत कारवाई

Yavatmal News : रोजच्या वापरात असलेले खाद्य तेल नागरिकांकडून खरेदी केले जात असते. चांगल्या प्रतीचे तेल देणाऱ्या विशिष्ट कंपनीचे तेल खरेदी करून वापरत असतात.

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: रोजच्या वापरातील खाद्य तेलाचा सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बॅन्डचे बनावट डबे तयार करून त्याची सर्रास विक्री सुरू होती. हा प्रकार अधिकृत कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीचे पथक यवतमाळात दाखल होत पोलिसांच्या मदतीने धाड टाकली. यात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानदारांवर कारवाई केली आहे. 

रोजच्या वापरात असलेले खाद्य तेल नागरिकांकडून खरेदी केले जात असते. चांगल्या प्रतीचे तेल देणाऱ्या विशिष्ट कंपनीचे तेल खरेदी करून वापरत असतात. मात्र त्याच कंपनीचे तांबे बनवून बनावट खाद्य तेल विक्री करण्याचा प्रकार (Yavatmal) यवतमाळमध्ये सुरु होता. सदरचा प्रकार कंपनी प्रतिनिधींना माहिती झाल्यानंतर त्यांनी चार दिवस मुख्य बाजारपेठेसह शहराच्या विविध भागांत सर्व्हे केला. या नंतर पोलिसांच्या (Police) मदतीने धाडसत्र राबविले. 

तेल जप्त करत गुन्हा दाखल 

यामध्ये बनावट तेलाचे डबे जप्त करण्यात आले असून या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. बॅन्डच्या नावाने बनावट तेलाचे डबे विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेत हातवर केले आहे. आम्ही ठोक विक्रेत्याकडून तेलाचे डबे आणले आहे. हुबेहुब बॅन्डसारखे दिसतात. यातील फरक ओळखू शकत नाही, असे सांगितले. या प्रकरणात तेल जप्त करून विक्रेत्यांविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

SCROLL FOR NEXT