Coriander Price : कोथिंबिरीला भाव नसल्याने शेतकऱ्याने फिरवला नांगर

Nashik News : नाशिकच्या येवला तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोथंबिरीचे पीक घेतले. सुरवातीला चांगला दर मिळालेला असतांना सध्या आवक वाढू लागली आणि दरात घसरण झाली
Coriander Price
Coriander PriceSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : कोथंबीरीला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कोथंबीरीची लागवड केली. मात्र बाजारात  वाढल्याने कोथंबीरीचे दर घटले. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. कोथंबीरी शेतातून काढून विक्री करण्याऐवजी शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवून टाकला आहे.  

Coriander Price
Hingoli News : पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच वृद्ध पत्नीनेही सोडले प्राण; दोघांवर सोबतच अंत्यसंस्कार

नाशिकच्या (Nashik) येवला तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कोथंबिरीचे पीक घेतले. सुरवातीला चांगला दर मिळालेला असतांना सध्या आवक वाढू लागली आणि दरात घसरण झाली. यामुळे राजापूर येथिल शेतकरी (Farmer) विठ्ठल वाघ यांनी एक एकर क्षेत्रात लागवड केलेल्या कोथंबिरीला व्यापाऱ्याने सात हजार रुपयांचा दर मागितला. परंतु त्यांनी मागितलेला दर न मिळता कमी भाव मिळाला. हा दर परवडत नसल्याने हताश झालेल्या वाघ यांनी आपल्या एक एकर क्षेत्रातील कोथंबिरीचे पीक नांगरुन नष्ट केले. 

Coriander Price
Bhandara Heavy Rain : भंडाऱ्यात पुन्हा संततधार पाऊस; अनेक घरांमध्ये शिरले पाणी, राज्य मार्गावरही साचले पावसाचे पाणी

कोथंबिर पिकवतांना हजारो रुपये खर्च झाले. मात्र ती कवडीमोल भावात विक्री होत असल्याने तोडणी, विक्रीला घेऊन जाण्याचा खर्च निघत नसल्याने अखेर विठठल वाघ यांनी आपल्या शेतातील एक एकर शेतातील कोथंबिरीवर नांगर फिरवला. कोथंबिरीचे पीक काढून टाकल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com