Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : यवतमाळमध्ये महाविकास आघाडी समर्थकांकडून जल्लोष करत घोषणाबाजी; संजय देशमुख यांना आघाडी

Yavatmal News : लोकसभा निवडणुकीची आज होत असलेल्या मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. यवतमाळमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झाला

Rajesh Sonwane

संजय राठोड 
यवतमाळ
: महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे विजयाच्या वाटेवर असताना यवतमाळमध्ये महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटाच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष करण्यास सुरवात केली आहे. तर महाविकास आघाडी जिंदाबाद असे नारे यावेळी कार्यकर्त्यांनी दिले.

लोकसभा निवडणुकीची आज होत असलेल्या मतमोजणीनंतर निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. यवतमाळमधून (Mahavikas Aaghadi) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. यापूर्वीच कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आतापर्यंत ५३ हजार ११६ मतांची लीड घेतली आहे. 

यवतमाळ (Yavatmal) येथील शासकीय धान्य गोडाऊन परिसरात मतमोजणी करण्यात येत असून मतमोजणी केंद्राबाहेर महाविकास आघाडी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जमले असून ते घोषणाबाजी करताना कार्यकर्ते दिसून येत आहे. १६ व्या फेरी अंती ५३ हजार ११६ मतांची आघाडी देशमुख यांनी घेतली आहे. ही आघाडी पाहता कार्यकर्त्यांमध्ये यवतमाळमध्ये उत्साह दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची बैठक

Electric Car: GenZ साठी खास! 'या' आहेत टॉप ५ अफोर्डेबल लक्झरी इलेक्ट्रिक कार्स

Tomato Rassa: रोजच्या भाज्यांपासून कंटाळा आलाय? मग एकदा नक्की ट्राय करा हा झणझणीत टोमॅटो रस्सा!

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी लाल चंदनाचा हा उपाय करून पाहाच; बिघडलेली सर्व कामं होतील

Raj-Uddhav Thackeray: आता संभ्रम नको, युती होणं गरजेचं; ठाकरेंची 'रोखठोक' भूमिका

SCROLL FOR NEXT