Kalyan Election 2024 Result: विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तीन लाख लाडूंची ऑर्डर

Shrikant Shinde Lead Against UBT’s Vaishali Rane From Kalyan Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून राज्यातील बहुतांश मतदार संघातील निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे.
Kalyan Election 2024 Result: विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तीन लाख लाडूंची ऑर्डर
Shrikant Shinde's Supporters Celebrating Kalyan Lok Sabha ResultSaam TV

अभिजित देशमुख 

कल्याण : कल्याण लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बाराव्या फेरीपर्यंत दीड लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळाले आहे. यामुळे शिवसेना कार्यकर्ता पदाधिकाऱ्याने आनंद साजरा केला. तर शिवसेना शहर प्रमुखांकडून तीन लाख लाडूंची ऑर्डर देण्यात आली आहे. 

Kalyan Election 2024 Result: विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तीन लाख लाडूंची ऑर्डर
Jalgaon News : काम नसल्याने बेरोजगार तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून राज्यातील बहुतांश मतदार संघातील निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. यात कल्याण (Kalyan) लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर रिंगणात होत्या. मात्र पहिल्या फेरीपासून श्रीकांत शिंदे यांनी आघाडी कायम ठेवली होती. यात श्रीकांत शिंदे यांना ३ लाख ४६ हजार ९०७ मते पडली तर वैशाली दरेकर यांना १ लाख ८० हजार ४९४ मते पडली असून श्रीकांत शिंदे यांनी जवळपास १ लाख ६६ हजार ४१३ मतांनी आघाडी घेतली आहे. 

Kalyan Election 2024 Result: विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तीन लाख लाडूंची ऑर्डर
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने उधळला गुलाल; १ लाखापेक्षा अधिकची आघाडी मिळाल्याने जल्लोष

श्रीकांत शिंदे यांनी आघाडी घेतल्याने (Shiv Sena) शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना लाडू खाऊ घालत शिवसेना पदाधिकाऱ्यांना आनंद व्यक्त केला. तसेच परिसरात विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तब्बल ३ लाख लाडूंची ऑर्डर देण्यात आली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com