Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News: कोळशाची अवैध तस्‍करी; ८ ट्रक केले जप्‍त, यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई

कोळशाची अवैध तस्‍करी; ८ ट्रक केले जप्‍त, यवतमाळ पोलिसांची मोठी कारवाई

साम टिव्ही ब्युरो

यवतमाळ : केंद्र शासनाचा कर बुडवून कोळशाची अवैधरीत्या वाहतूक सुरू होती. अशा अवैध कोळशाची तस्करी करण्याऱ्यांविरुद्ध यवतमाळ (Yavatmal) पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. यात तब्‍बल आठ कोळश्‍याचे ट्रक जप्‍त केले आहेत. (Letest Marathi News)

यवतमाळ जिल्‍ह्यातील वणी- मुकुटबन मार्गावरून कोळशाची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याची माहिती वणीचे ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत बुधवारी सकाळी वणीकडे कोळश्‍याने भरलेले आठ ट्रक पोलिसांनी अडविले. या ट्रकची झडती घेतली असता, यात कोळसा असल्‍याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी सर्व ट्रक ताब्यात घेतले आहेत. या कारवाईने कोळसा व्यावसायिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे.

कोट्यावधीचा कर बुडवून वाहतूक

पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकची किंमत दोन कोटी २१ लाख रुपये आहे. तर या ट्रकमध्ये २० लाख ८० हजारांचा कोळसा भरून होता. मुख्‍य म्‍हणजे केंद्र सरकारचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडवून अवैधरित्या कोळशाची तस्करी करणारे 8 ट्रक पोलीसांनी जप्‍त केले आहेत.

सीबीआय चौकशीची मागणी

या व्यवसायातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरी देखील यवतमाळ पोलीस या प्रकरणी ट्रान्सपोर्टर किशोर अग्रवाल आणि BS इसपात LTD कंपनीच्या लोकांची चौकशी करणार असल्‍याची सूत्रांनी माहिती आहे. तर स्थानिकांकडून या प्रकरणी सीबीआई चौकशीची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT