Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal News : धरणात शेतकऱ्यांचे सामूहिक जलसमाधी आंदोलन; सिंचन विभागाचा केला जाहीर निषेध

Yavatmal News : लघु सिंचन प्रकल्पाच्या कालव्या धरणाच्या सिंचन क्षेत्रात शिरसगाव, ब्राह्मणवाडा, सावरगाव आदी गावातील जमीन सिंचनाखाली येते. परंतु मागील पंधरा वर्षापासून टेलपर्यंत अजूनही पाणी गेले नाही

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : नेर तालुक्यातील शिरसगाव येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या कालव्यात प्रचंड अनागोंदी आहे. (Yavatmal) बारा किलोमीटरच्या कालव्याचे पाणी केवळ चार ते पाच किलोमीटरपर्यंत पोहोचते. वेळोवेळी निवेदन देऊनही सिंचन विभाग व सरकारला जाग न आल्यामुळे अखेर संतप्त (farmer) शेतकऱ्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. (Maharashtra News)

यवतमाळ जिल्ह्यातील शिरसगाव येथील लघु सिंचन प्रकल्पाच्या कालव्या धरणाच्या सिंचन क्षेत्रात शिरसगाव, ब्राह्मणवाडा, सावरगाव आदी गावातील जमीन सिंचनाखाली येते. परंतु मागील पंधरा वर्षापासून टेलपर्यंत अजूनही पाणी गेले नाही. मागील वर्षी शेतकऱ्यांनी याबाबत पाठपुरावा केल्यामुळे पहिल्यांदा टेलपर्यंत पाणी पोहोचले होते. परंतु या कालव्यात साचलेला गाळ, वाढलेली वनस्पती, मेजर व मायनर तुटलेले गेट, जागोजागी लिक होत असलेला कालवा, कालव्याची लेव्हल चढ-उतार असल्यामुळे पाणी पुढे सरकत नाही. या भागातील शेतकरी सिंचनापासून अनेक वर्षापासून वंचित आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिंचन विभागाकडून प्रचंड अनागोंदी सुरु आहे. बारा किलोमीटरच्या कालव्याचे पाणी केवळ चार ते पाच किलोमीटरपर्यंत पोहोचत असते. लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आजपर्यंत वेळोवेळी जिल्हाधिकारी व सिंचन विभागाला निवेदने दिली. परंतु लाल फीतशाहीने या निवेदनाला केराची टोपली दाखवली. शेवटी संतप्त शेतकऱ्यांनी आज (६ नोव्हेंबर) धरणात जलसमाधी आंदोलन करीत सिंचन विभाग व सरकारचा जाहीर निषेध केला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. जोपर्यंत कालव्याच्या दुरुस्तीचे लेखी आश्वासन अधिकारी देणार नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर येणार नाही; असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

SCROLL FOR NEXT