Yavatmal News: एकाच दिवशी सर्व शिक्षकांनी शाळेला मारली दांडी; विद्यार्थ्यांसाठी सरपंचताईंनी घेतला क्लास

Yavatmal News: कानडी-पार्डी या गट ग्रामपंचायतीच्या सरपंचाने स्वतःच विद्यार्थ्यांचा क्लास घेतला आणि शिक्षण विभागाच्या तोंडावर अनोखी चपराक दिली.
Yavatmal News
Yavatmal NewsSaam TV
Published On

संजय राठोड, यवतमाळ

Yavatmal News:

यवतमाळच्या मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कानडा या आदिवासी बहुल जिल्हा परिषदच्या शाळेत एकूण नऊ विध्यार्थी आहेत. त्यांना शिकवायला एक पूर्ण पगारी शिक्षक तर एक कंत्राटी शिक्षक आहे. मात्र या दोन्ही महाशयांनी शाळेला एकाच दिवशी दांडी मारली. हे पाहून गावातील मनसेच्या महिला सरपंच सुषमा ढोके यांनी स्वत:च विद्यार्थ्यांचा क्लास घेतला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Yavatmal News
Dombivli Crime News: नात्याला काळीमा! काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

एरवी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाची दुरवस्था असल्याने अनेक ठिकाणी गावकरी आंदोलन करतात. मात्र मारेगाव तालुक्यातील कानडी-पार्डी या गट ग्रामपंचायतीच्या सरपंचाने स्वतःच विद्यार्थ्यांचा क्लास घेतला आणि शिक्षण विभागाच्या तोंडावर अनोखी चपराक दिली.

कानडा आणि पार्डी हे गट ग्रामपंचायतीत असून सातशे लोकसंख्येचे हे गाव आहे. ज्यांची आर्थिक स्थिती समृद्ध आहे. ते सर्व आपल्या पाल्यास खासगी शाळेत शिक्षणासाठी पाठवितात पण गरिबांची ती ९ चिमुरडी मुलं मात्र सरकारी शाळेत शिकतात अशावेळी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊनये म्हणून मनसेच्या त्या महिला सरपंच ताईने शाळा भरवली आणि प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घातले.

शिक्षकांना पगार देण्यासाठी पैसा नसल्याने शाळा होणार बंद; दिवाळीनंतर ३२ शाळांना कुलूप?

गावात आणि खेड्यापाड्यांत आतापर्यंत बऱ्याच शाळांना कुलूप लागले आहे. भंडारा जिल्हा परिषद शाळांमध्ये एकत्र विद्यार्थी पटसंख्या फार कमी असते. तसेच काही शाळांत शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शाळा सुरु ठेवण्याबाबत प्रश्न असतो. परंतु तासिका शिक्षकांना पगार देण्यासाठी जिल्हा परिषदकडे पैसा नाही. यामुळे भंडारा जिल्ह्यातील ३२ शाळा दिवाळीनंतर बंद होण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती समोर आलीये.

भंडारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ३२ माध्यमिक शाळा आहेत. या शाळा दिवाळीनंतर बंद होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ७२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. ७२ लाख रूपये दिवाळीपर्यंत तासिका शिक्षकांचा पगार देऊ शकतात. मात्र, यानंतर तासिका शिक्षकांना पैसे देता येणार नाही, असे कारण समोर आलेय.

Yavatmal News
Kalyan Crime: युट्युबवर व्हिडिओ पाहून एटीएम मशीनमध्ये छेडछाड; चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com