Dengue
Dengue Saam tv
महाराष्ट्र

डेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यामध्ये डेंगू, मलेरिया आणि टायफाईडने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यामुळे उपचारासाठी बेड मिळत नसल्याचे चित्र शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांमध्ये (Hospital) दिसून येत आहे. (Yavatmal Today News)

सध्याचे वातावरण किटकजन्य आजाराला (Yavatmal News) पोषक असल्याने काही दिवसांपासून किटकजन्य सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. या रोगराईला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. मात्र यावर्षी आरोग्य विभागाने (Health Department) किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम न राबविल्यामुळे लहान मुलांना (Dengue) डेंगू, टायफाईड, मलेरिया या सारखे आजार होत आहे.

लहान मुलांमध्‍ये जास्‍त लागण

डेंग्‍यू, मलेरीया या आजाराचे प्रमाण लहान मुलांमध्‍ये अधिक पहावयास मिळत आहे. रुग्णालयात उपचारासाठी लहान मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत असून सरकारीसह खाजगी रूग्णालयात प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KL Rahul Record: केएल राहुलला नंबर १ बनण्याची संधी! अवघ्या ३५ धावा करताच रचणार इतिहास

Buldana News | बुलढाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई

Narayan Rane: उद्धव ठाकरे दोनदा मातोश्री सोडून पळून गेले होते, मीच परत आणलं; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

Best Bus News: लवकरच तिकीट दरवाढ! बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Eknath Khadse News | प्रवेश लांबला तरी खडसेंकडून भाजपचा प्रचार सुरू, मतदान वाढवण्यासाठी दिला मंत्र

SCROLL FOR NEXT