Yavatmal Grandmothers Scored 98 Percent Saam Tv
महाराष्ट्र

Yavatmal News: आजी असावी तर अशी! ९८ टक्के गुण मिळवत संधीचं केलं सोनं, नातवंडांसमोर निर्माण केला आदर्श

Yavatmal Grandmothers Scored 98 Percent: ज्या वयामध्ये आपल्या नातवंडांना शाळेमध्ये सोडायला जायचे असते त्या वयात या आजींनी शिक्षण घेत चांगले गुण मिळवले आहे. त्यांची या वयामधील ही उत्कृष्ट कामगिरी पाहून आश्चर्यचकीत होत अनेकांनी तोंडामध्ये बोटं घातली आहेत.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

साठी पार केल्यानंतर बऱ्याच व्यक्ती या अंथरूनाला खिळून बसतात. पण काही आजी-आजोबा असे असतात की या वयातही ते कमाल करून दाखवतात. अशाच यवतमाळच्या दोन आजींची सध्या जिल्ह्यामध्ये काय संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा होत आहे. या आजींनी केलेली कामगिरी पाहून प्रत्येक मुलं हेच म्हणतील की आजी असावी तर अशी. या आजींनी साठीच्या वयामध्ये तब्बल ९८ टक्के गुण मिळवत संधीचं सोनं केलं आहे.

आताची मुलं शिक्षण म्हटलं की कंटाळा करता. शाळेमध्ये जायला आणि अभ्यास करायला त्यांना नको वाटते. अशा या मुलांसमोर यवतमाळच्या आजींनी आदर्श निर्माण करून दाखवला आहे. ज्या वयामध्ये आपल्या नातवंडांना शाळेमध्ये सोडायला जायचे असते त्या वयात या आजींनी शिक्षण घेत चांगले गुण मिळवले आहे. त्यांची या वयामधील ही उत्कृष्ट कामगिरी पाहून आश्चर्यचकीत होत अनेकांनी तोंडामध्ये बोटं घातली आहेत.

खरतर माणूस शेवटच्या श्वासापर्यंत एक विद्यार्थी म्हणून जीवन जगत असतो. रोज नविन काही तरी तो शिकत असतो. मात्र आज आपण बघणार आहोत ज्यांनी वावरात काबाडकष्ट केलं अशा म्हातारपण आलेल्या आजींनी यंदा परीक्षा दिली अन् चक्क ९८ टक्के गुण मिळवत यवतमाळ जिल्ह्यात अव्वल नंबर पटकावला. या आजींनी आतापर्यंत हातात कधी पाटी-पुस्तक पकडलेही नाही, कधीही त्या शाळेतही गेल्या नाहीत. पण आता उतारवयात शिक्षणाची संधी मिळताच त्यांनी संधीचे सोनं केलं.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये चांगली कमागिरी करत ९८ टक्के गुण मिळवणाऱ्या फक्त एकट्या आजी नाहीत तर दोघी आहेत. एका आजीचे नाव मिरा मारोती पेंदोरे तर दुसऱ्या आजीचे नाव सुशीला पुंजाराम ढोके असे आहे. प्रौढ असाक्षरांसाठी झालेल्या परिक्षेतील टॉप वयोवृद्ध विद्यार्थ्यांची ही यशोगाथा आहे. प्रौढ असाक्षरांना शिकवून त्यांची १५० गुणांची परिक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल नुकताच राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आला.

राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये यवतमाळच्या अकोलाबाजार येथे राहणाऱ्या मीरा पेंदोर आणि बाभुळगाव तालुक्यातील घारफळ येथे राहणाऱ्या सुशीला ढोके या दोन आजीबाईंनी चक्क ९८ टक्के गुण मिळवत कमाल केली आहे. या आजींनी इतर ज्येष्ठ महिलांपुढेच नाही तर नातवंडांपुढे आदर्श ठेवला आहे. सध्या या आजींची जिल्हाभरात चर्चा होत असून त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

SCROLL FOR NEXT