यवतमाळ नगर परिषद SaamTVnews
महाराष्ट्र

यवतमाळ नगर परिषद निवडणूक; प्रभाग रचनेच्या कच्च्या आराखड्याला प्रारंभ

यवतमाळ शहरातील संभाव्य प्रभागरचना डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. नगरपरिषद प्रभाग रचनेसोबतच सदस्य संख्या वाढली जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- संजय राठोड

यवतमाळ - यवतमाळ शहरातील संभाव्य प्रभागरचना डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. जुन्या नव्या चेहऱ्यांची सरमिसळ कशी करायची यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, कायम सत्तेच्या बाजूने राहणाऱ्या संधी साधूंनकडूनही आता कोणत्या पक्ष निवडायचा याचे आराखडे बांधले जात आहे. सध्या तरी इच्छुक उमेदवार व राजकीय पक्ष यांच्याकडून सर्व पडताळणी केली जात आहे.

हे देखील पहा :

यवतमाळ नगरपरिषदेची निवडणूक काही महिन्यात होऊ घातली आहे. नव्या आदेशाप्रमाणे सदस्य संख्या निश्चित केली जात आहे. एक लाखापर्यंत लोकसंख्येसाठी चाळीस व त्यानंतर आठ हजार मागे एक असे प्रमाण आहे. त्यानुसार यवतमाळ नगर पालिकेची सदस्य संख्याही ५८ किंवा जास्तीत जास्त ५९ इतकी होण्याचे संकेत आहे. यवतमाळ नगरपरिषद मध्ये ५६ नगरसेवक असून भाजपची सत्ता आहे. भाजप कडे २९ नगरसेवक आहेत. तर नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे. सातत्याने या पालिकेवर भाजपने सत्ता स्थापित केली आहे. काँग्रेसला बऱ्याच दशकांपासून पालिकेतील सत्तेत संधी मिळालेली नाही.

नगरपरिषद प्रभाग रचनेसोबतच सदस्य संख्या वाढली जाणार आहे. शहराची लोकसंख्या दोन लाख ४८ हजार ९३९ इतकी गृहीत धरली जाणार आहे. यवतमाळ नगर परिषदेतील पक्षीय बलाबल संख्या भाजप २९, शिवसेना ८, राष्ट्रवादी काँग्रेस ४, काँग्रेस १२, बीएसपी २ आणि अपक्ष एक एकुण ५६ नगरसेवक आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा जरी असला तरी पालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. नाट्यगृह, उद्यान आणि डम्पिंग चा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर कुणाला मिळणार संधी? सुनेत्रा पवारांची पहिली कसोटी|VIDEO

Pune Accident: जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा अपघातात मृत्यू

'शिवराय लढून थकले, रामदासांकडे राजपाट दिला, बागेश्वर बाबानं तोडले अकलेचे तारे

मुलीवर वाईट नजर, पालकांनी केलं टक्कल, मुलीच्या सुरक्षेसाठी पालकांनी केलं विद्रुप

Vaibhav suryawanshi Century : १२ षटकार, ५ चौकार, १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीनं अवघ्या ३६ चेंडूंत ठोकलं शतक, आयपीलमधील सर्वात वेगवान सेंच्युरी

SCROLL FOR NEXT