Yavatmal Khorad Dam two brothers drowned to death Saam Tv News
महाराष्ट्र

Yavatmal News : ऐन सणासुदीच्या दिवशी घरात आई-वडिलांचा टाहो, दोघे मावस भावांचा बुडून मृत्यू; गाव सुन्न

Yavatmal Two Die Drowning : बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले असून पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत.

Prashant Patil

यवतमाळ : धुळवडीच्या दिवशी धरणात पोहोण्यासाठी उतरलेल्या पाच जणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळच्या डोंगरखर्डा इथूनजवळ असलेल्या खोरद येथील धरणावर घडली. आठ जण पोहोण्यासाठी गेले होते. त्यापैकी पाचजण अचानक बुडायला लागले, त्यातील तिघांना वाचविण्यात यश आले तर दोन मावस भावांचा यात बुडून मृत्यू झाला.

बुडालेल्या एकाचा मृतदेह हाती लागला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले असून पंकज झाडे आणि जयंत धानफुले अशी मृतकांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोईर यांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. दरम्यान, बोटीच्या सहाय्याने पाचपैकी तिघांना वाचविण्यात यश आलं आहे. शोध मोहिमेदरम्यान मृतक पंकज झाडे याचा मृतदेह मिळाला असून जयंत धानफुले यांचा मृतदेह मिळालेला नाही. अधिक तपास कळंब पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT