Yavatmal Farmer daughter was tortured SaamTV
महाराष्ट्र

सोयाबीन पोते नेण्यासाठी रात्रपर्यंत ताटकळत ठेवलं, शेतकऱ्याच्या लेकीसोबत वखार महामंडळाची संतापजनक वागणूक

Yavatmal Farmer Daughter Injustice : पुसद शहरातील वाशिम रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते.

Prashant Patil

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकरी मुलीला स्वतःचे सोयाबीन पोते घेण्यासाठी रात्र होईपर्यंत ताटकळत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुसद वखार महामंडळाचे साठा निरीक्षक महेश पंजाबराव गिरी यांच्या प्रतापामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊन आर्थिक फटका बसला आहे. दोषी असलेल्या साठा अधीक्षक महेश गिरी आणि सतीश जाधव यांच्यावर कठोर कारवाईसाठी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना शेतकरी मुलीने तक्रारीतून मागणी केली आहे.

पुसद शहरातील वाशिम रोडवरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये प्रकाश काळे या शेतकऱ्याने आपले दीडशे क्विंटल सोयाबीन पोते ठेवले होते. ६ फेब्रुवारी सोयाबीन खरेदीची नाफेडमार्फत शेवटची तारीख असल्याने त्यांची मुलगी ही सोयाबीन पोते घेण्याकरता मालवाहू वाहन घेऊन गोडाऊनला गेली होती. मात्र, साठा अधीक्षक महेश गिरी यांनी वेळकाढूपणा केला. तसेच ७ फेब्रुवारी रोजी तुमचे माल नाफेडमार्फत खरेदी करून देतो, माझे नाफेड अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे, असे सांगून कार्यालयातून काढता पाय घेतला.

तसेच मोबाईलसुद्धा बंद करून ठेवला. कार्यालयातील डाटा ऑपरेटर सतीश जाधव आणि अन्य कर्मचारी यांना शेतकरी मुलीने सोयाबीन पोते देण्याची विनंती केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. साठा निरीक्षक महेश पंजाबराव गिरी यांच्या प्रतापामुळे शेतकऱ्यावर अन्याय होऊन आर्थिक फटका बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अमेरिका व इराण युद्धामुळे सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम केळी उत्पादकांना मोठा फटका

Wednesday Horoscope: उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, कामाचा ताण जाणेल, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Rajya Sabha: भाजपचे अध्यक्ष आता खासदार होणार, 'या' राज्यातून मिळाली उमेदवारी, वाचा सविस्तर

३७ लाख नागरिकांच्या खात्यात प्रत्येकी ₹ २००० जमा होणार; विशेष पॅकेजची घोषणा, काय आहेत अटी?

Chandra Grahan 2026: चंद्र ग्रहण संपल्यानंतर करा ही कामं; नकारात्मक उर्जा होऊ शकते दूर

SCROLL FOR NEXT