Manasvi Choudhary
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप आणि कामाचा ताण यामुळे शरीराच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. सतत तेलकट, तिखट, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होतो.
आजकाल प्रौढ व्यक्तीसह तरूणांना देखील हार्ट अटॅक समस्येचा सामना करावा लागत आहे
परंतू, हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर काही संकेत देते. ही हार्ट अटॅकची लक्षणे ओळखून तुम्ही वेळीच उपाय करू शकता यामुळे मोठा धोका टळू शकतो.
हॉर्ट अॅटक येण्याच्या साधारण एक महिनापूर्वीच शरीरात त्याची लक्षणे दिसतात. जर आपण ती वेळीच ओळखली हार्टअॅटक टाळता येऊ शकतो.
सतत थकवा येणे, श्वास घ्यायला त्रास होणे या समस्या उद्भवू लागतात अनेकजण याला सामान्य समजतात मात्र हे गंभीर आहे.
शरीरातून रक्ताचे भिसरण व्यवस्थित होत नाही यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते.
हृदयाच्या आजारांमुळे रक्तप्रवाद मंदावतो ज्यामुळे अचानक चक्कर येणे, धाप लागणे ही लक्षणे दिसू लागतात. हृदयाचे ठोके आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे चक्कर येते हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
हृदयाचे ठोके वाढणे हे देखील हार्टअॅटकचे मोठे लक्षण आहे. त्यासोबतच छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही लक्षणे दिसतात.
जर तुम्हाला वरील लक्षणे दिसली तर वेळीच लक्ष द्या. ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. दुर्लक्ष करू नका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.