Yavatmal crime news saamtv
महाराष्ट्र

शिकवणीच्या नावाखाली शिक्षकानेच विद्यार्थिनीची अब्रू लुटली, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, मुलीचा मृत्यू

Yavatmal crime news: खासगी ट्यूशन घेणाऱ्या शिक्षकानं विद्यार्थिनीची अब्रू लुटली. गर्भवती विद्यार्थिनीचा मृत्यू. यवतमाळमध्ये खळबळ.

Bhagyashree Kamble

  • शिक्षक अन् विद्यार्थिनीच्या नात्याला काळिमा.

  • शिक्षकानं विद्यार्थिनीची अब्रू लुटली.

  • गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज झाल्यानं मृत्यू.

शिक्षक आणि विद्यार्थिनीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना यवतमाळमधून समोर येत आहे. प्रायव्हेट ट्यूशनच्या नावाखाली शिक्षकानं विद्यार्थिनीवर जबरदस्ती केली. तसेच लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडिता गर्भवती राहिली. त्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. तिनं अतिप्रमाणात गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्या. यामुळे तिची प्रकृती खालावली. तिचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. या प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

यवतमाळमधील एका गावात आरोपी खासगी शिकवण देत होता. पीडित मुलगी १६ वर्षांची होती. आरोपीकडे पीडित मुलगी शिकवण घेत होती. मात्र, शिक्षकाचा त्याच्या विद्यार्थिनीवर वाईट नजर होती. त्यानं पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तसेच तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. आरोपी वारंवार शिकविण्याच्या बहाण्यानं तिला घरी बोलावत होता.

तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. गोळ्यांचा ओव्हरडोज झाल्यामुळे तिला अस्वस्थ वाटू लागले. तसेच ती आजारी पडली. तिची प्रकृती खालावली. पीडितेनं कुटुंबियांना प्रकृती ढासळली असल्याची माहिती दिली.

अल्पवयीन मुलीला तातडीने नांदेड येथील शासकीय रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तपास करत शिक्षकाला अटक केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बडा नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

Horoscope Saturday: व्यवसायात होणार भरभराट, ५ राशींसाठी सुखाचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT