Yavatmal Om Butle Murder Saam Tv News
महाराष्ट्र

Om Butle News : सोबत बायको अन् तीन वर्षाचं लेकरू, पुण्याला जाताना घेरलं, पत्नीसमोर पतीला संपवलं; वाढदिवसादिवशी अंत्यसंस्कार

Yavatmal Om Butle Murder : यवतमाळच्या आर्णी इथे एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली असून उद्या वाढदिवस असलेल्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला आहे.

Prashant Patil

संजय राठोड, साम टीव्ही

यवतमाळ : यवतमाळच्या आर्णीत ओम बुटले या २३ वर्षीय तरुणावर अवधूत तिघलवाड सह अन्य दोघे अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओम गंभीर जखमी झाला होता आणि उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, उद्या म्हणजेच ३० मार्च रोजी ओमचा वाढदिवस होता, आणि त्याच दिवशी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यवतमाळच्या आर्णी इथे एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली असून उद्या वाढदिवस असलेल्या ओम बुटलेवर तिघांनी तलवार आणि चाकूने जीवघेणा हल्ला केला आहे. ओम बुटले (वय २३, रा. आर्णी) असं हल्ल्यातील गंभीर जखमी असलेल्या तरुणाचं नाव आहे. सध्या त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्गादेवी विसर्जनाच्या वेळी झालेल्या भांडणातून कोळवण येथील अजय तिघलवाड याचा ओम बुटले आणि दत्ता वानखडे यांनी खून केला होता.

१५ दिवसांपूर्वीच ओम बुटले जामिनावर बाहेर आला होता. पुण्याला बायकोला काही कामासाठी घेऊन जात असताना अवधूत तिघलवाड आणि अन्य दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात ओम बुटले हा गंभीर जखमी झाला आहे. अवधूत तिघलवाड पोलिसांच्या ताब्यात असून आर्णीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ओम बुटलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत अजय तिघलवाड याच्या वडिलांचा देखील या हल्ल्यात हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

आर्णी शहरातील माहूर रोडवर ट्रॅव्हल्स पॉईंटवर मृतक ओम बुटले आणि सोबत पत्नी व तीन वर्षीय छोटा बाळ सोबत घेऊन पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची वाट पाहत असताना अचानक ५ ते ७ जणांनी त्याला घेरून तलवारी आणि चाकूने हल्ला चढविला. अशातच जीव वाचवण्यासाठी ओम बुटलेने मुख्य रस्त्याने पळ काढला. मात्र ठोकर लागून पडल्याने मारेकऱ्यांनी थेट तलवारीने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या ओंमला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नाईक व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चुलुमुल्ला रजनीकांत हे घटनास्थळी शहरात दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silbatta Chutney Recipe: जेवणासोबत तोंडी लावायला ही पारंपरिक सिलबत्ता लसूण चटणी नक्की ट्राय करा, ५ मिनिटांत होईल रेसिपी

Marathi bhasha Vijay Live Updates : हातात गुढी घेऊन , डोक्यावर फेटे; मनसैनिक विजयी मेळाव्याला निघाले

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात, आदिती तटकरेंची माहिती

MNS worker Detained : मनसैनिकांना दादरमध्ये घेतलं ताब्यात, मुंबईतील वातावरण तापलं, हजारो कार्यकर्ते जल्लोष करत रवाना

SCROLL FOR NEXT