Yasmin Sheikh Marathi language scholar passes away at 101 saam tv
महाराष्ट्र

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली; शिक्षण क्षेत्रात शोककळा

Marathi Grammar Expert Yasmin Sheikh Dies at 101: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्र क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. यास्मिन शेख यांचे पुण्यात वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Omkar Sonawane

मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील जेष्ठ अभ्यासक यास्मिन शेख यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. त्याच्या निधनाने मराठी भाषा आणि व्याकरण क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. यास्मिन शेख यांना नुकत्याच झालेल्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नांदी संमेलनात सन्मानित करण्यात आले होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्या या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नव्हत्या.

मराठी भाषेच्या अभ्यास आणि संवर्धनासाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. बालभारतीच्या मराठी विषयाच्या पाठपुस्तकांचे इतर सदस्यांच्या सहकार्याने त्यांनी तब्बल 7 वर्षे संपादन केले होते. त्यांच्या पश्च्यात दोन मुली आहेत. डॉ. शमा आणि प्रा.रुकसाना असा त्यांचा परिवार आहे. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रा. यास्मिन शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मराठीवरील प्रभुत्व आणि निस्सीम प्रेम याद्वारे भाषाशास्त्रात उत्तुंग आदर्श निर्माण करणाऱ्या विदुषी, व्याकरण तज्ज्ञ, भाषाशास्त्राच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा. यास्मिन शेख यांचे निधन शोकदायी असल्याची भावना व्यक्त करून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मराठी भाषेसह व्याकरणाच्या समृद्धीसाठी आयुष्य वेचणाऱ्या डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ आणि समर्पित कार्यातून मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषाविश्वाची मोठी हानी झाली असून मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

Maharashtra News Live Update: पुण्यात पाणीटंचाईची झळ! स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटरसाठी लवकरच नियमावली

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT