Famous Actor Death : हरहुन्नरी कलाकार हरपला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्व शोकसागरात

Famous Actor Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले आहे. मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. अभिनेत्याच्या कारकि‍र्दीबद्दल जाणून घेऊयात.
Famous Actor Passed Away
Famous Actor Deathsaam tv
Published On
Summary

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनोरंजन विश्वावर पसरली शोककळा

चित्रपटसृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाले, अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध पोलिश अभिनेते आंद्रेज बेया-झाबोर्स्की यांचे निधन झाले आहे. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

e24bollywood ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेते आंद्रेज बेया-झाबोर्स्की ( Andrzej Beja Zaborski) यांच्या निधनाची पुष्टी बियालस्टोक पपेट थिएटर (बियालोस्टोकी टिटर लालेक) आणि प्रादेशिक अधिकाऱ्यांनी केली. अभिनेते आंद्रेज बेया-झाबोर्स्की यांचे निधन ११ ऑगस्ट रोजी झाले. अभिनेत्याने वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले.

आंद्रेज बेया-झाबोर्स्की यांनी १९७० मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९७८ मध्ये त्यांनी बियालिस्टोक येथील राज्य नाट्यशाळेच्या बाहुलीनाट्य विभागातून पदवी प्राप्त केली. ते जवळपास चार दशके बियालिस्टोक पपेट थिएटरशी संबंधित राहिले. त्यांनी रंगमंचावर अभिनय केला आणि दिग्दर्शनही केले. एक शिक्षक म्हणून त्याने तरुण कलाकारांना आपले अनुभव सांगितले. कालांतराने, बेयाने कॅमेऱ्यासमोरही सातत्याने काम केले. चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधील त्याच्या भूमिकांना चांगला प्रतिसाद मिळाला.

Famous Actor Passed Away
Govinda - Sunita Ahuja : "तुझा शुगर डॅडी इतका श्रीमंत..."; गोविंदाला 'त्या' अभिनेत्रीसोबत पाहून सुनीता आहुजा भडकली|VIDEO व्हायरल

'उ पाना बोगा' या मालिकेमुळे अभिनेत्याला राष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता मिळाली. या मालिकेत त्याने कमांडर हेन्रिक वोल्कोविकीची भूमिका साकारली. पोडलासी या काल्पनिक शहरातील रहिवाशांवर आधारित ही मालिका प्रचंड गाजली आणि आंद्रेजचे पात्रही प्रेक्षकांच्या मनाला भिडले. अभिनेते आपल्या टिव्ही मालिकांपेक्षा चित्रपटांसाठी अधिक ओळखले जात होते. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच मनोरंजन विश्वातील कलाकार आणि चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com