Chandrashekhar Bawankule 
महाराष्ट्र

'त्या' विधानाने अमरावतीत राजकीय भुकंप! यशोमती ठाकूर बावनकुळेंवर संतापल्या; पाहा काय घडलं?

राहुल गांधी यांच्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेवर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. बावनकुळे यांनी जिभेवर लगाम आणावा, असा इशारा ठाकूर यांनी दिला.

Namdeo Kumbhar

चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. बावनकुळेनी केलेल्या टीकेला काँग्रेसच् आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. "बावनकुळे साहेब, तुम्ही जरा तुमच्या जिभेवर लगाम आणा. पुन्हा अशी भाषा वापरल्यास तुमची गाठ सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्यांशी असेल," असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधींवर वैयक्तिक टीका केली होती. "राहुल गांधी सठिया गेले आहेत, त्यांचा बुद्धिभ्रंश झाला आहे आणि त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे," असे वादग्रस्त वक्तव्य बावनकुळे यांनी केले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे असून राहुल गांधींना देशाने नाकारले आहे, असेही ते म्हणाले होते.

बावनकुळे यांच्या या विधानावर पलटवार करताना ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "चंद्रशेखर बावनकुळे हे एक गंभीर राजकीय नेते असून वैचारिक पातळीवर ही लढाई लढतील असे वाटले होते; मात्र ते चक्क वैयक्तिक पातळीवर येऊन बोलत आहेत. राहुल गांधी हे देशाच्या संसदेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि ज्या गांधी-नेहरू घराण्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले, त्या घराण्याचे ते प्रतिनिधी आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे वैयक्तिक टीका करण्याइतकी बावनकुळेंची राजकीय उंची नाही."

सरकारवर ताशेरे :

पुढे बोलताना त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले, "देशातील व राज्यातील वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि जनतेच्या मूळ प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांकडे बोलायला काहीच नाही. पुण्यात पार पडलेला 'छात्रों की बात' कार्यक्रम आणि इंदूरचा राहुल गांधींचा कार्यक्रम विरोधकांच्या डोळ्यात खुपला असून तो त्यांना सहन झालेला नाही; म्हणूनच ते अशी वैयक्तिक चिखलफेक करत आहेत, असे ठाकूर म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल बोंद्रे काँग्रेसमध्येच; बुलढाणा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजकारणातील सर्वात मोठा धक्का! भाजपचा दारूण पराभव, सर्वच नगरसेवकांनी केली बंडखोरी, चक्रावून टाकणारा निकाल

Cancer symptoms in women: रात्री उशिरा जेवण टाळा! झोप, पचन आणि वजनावर होऊ शकतो परिणाम

भाजप अन् आम आदमी पक्षाची 'या' ठिकाणी युती; राजकारणातली सर्वात मोठी बातमी

Mumbai News: मुंबई आहे की गाव? लाईट नसल्याने मोबाईची टॉर्च लावून अंत्यसंस्कार, VIDEO समोर

SCROLL FOR NEXT