Sambhaji Nagar Police Station Saam Tv
महाराष्ट्र

तरुणीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याचं आमिष दाखवलं; त्यानंतर केलं असं...

परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात दोन भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड - वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ असे आमिष दाखवून 2 भामट्यांनी, बीडच्या परळी शहरातील एका महिलेला, तब्बल 14 लाखाला गंडा घातल्याचं उघडकीस आलंय.भामट्यांनी फसवणूक केल्याने मुलीचे शिक्षण अर्धवट राहिले असून पैसा बरोबरच वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न देखील मातीत मिसळले आहे. त्यामुळं संबंधित महिलेने परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परळी शहरातील माधवबाग परिसरात राहणाऱ्या मनीषा नंदकुमार फड यांची मुलगी, गतवर्षी नीट परिक्षा उत्तीर्ण झाली. तिच्या वैद्यकीय प्रवेशासाठी कुटुंबीय प्रयत्नात होते. त्या दरम्यान मनीषा यांचे दिर सुनील श्रीरंग फड यांना युवराज सिंग उर्फ सोनू कुमार आणि नितांत गायकवाड रा . पुणे या दोघांनी कॉल केला. आणि पुण्यात त्यांची कन्सलटन्सी असल्याचे सांगितले. नीट परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तुमच्या मुलीला आम्ही पॉंडीचेरी येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देऊ. त्यासाठी पाच वर्षाच्या खर्चासह 75 लाख रुपये लागतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन फड यांनी मुलीचे शैक्षणिक कागदपत्रे आणि पहिल्या टप्प्यातील मागणीनुसार एकूण 14 लाख रुपये त्यांना 8 फेब्रुवारी रोजी पाठविले.

हे देखील पाहा -

त्यानंतर 22 मार्च रोजी आणखी 5 लाख रुपये, त्या दोघांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये नेऊन दिले. नंतर तुमची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे म्हणून त्यांनी फड कुटुंबियांना पॉंडीचेरी येथे बोलावून घेतले. मात्र तिथे गेल्यानंतर युवराज सिंग याने या कॉलेजचे प्रवेश बंद झाले आहेत, असे सांगून इतर कॉलेजमध्ये प्रवेश देतो, अशी बतावणी करू लागला.

त्यावरून फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं, आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही. आमचे पैसे परत करा असे त्याला सांगितले. त्यानंतर युवराज सिंगने 5 लाख रुपये परत केले. मात्र उर्वरित 14 लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून अद्यापही त्याने ती रक्कम परत केली नाही. अखेर हताश झालेल्या मनीषा फड यांनी परळीचे संभाजीनगर पोलीस ठाणे गाठत सारा प्रकार पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना सांगितला व पोलीसात तक्रार दिली. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात युवराज सिंग आणि नितांत गायकवाड या दोघांविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात, कलम 420, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

Maharashtra Live News Update: ५ दिवस पुन्हा अवकाळी, उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी

Success Story: जर्मनीतील नोकरी सोडली, भारतात रिसेप्शन म्हणून काम केले, दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS पूजा यादव यांचा प्रवास

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

SCROLL FOR NEXT