कल्याण - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली (Dombivli) महापालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे सुरू केली असली तरी ती फार संथ गतीने चालू आहे. दरम्यान नालेसफाईच्या कामाची पाहणी पालिका आयुक्तांनी केली. यावेळी आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे 30 टक्के पूर्ण झाली असून पावसाळयाआधी नालेसफाई पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
तर पाऊस अवघ्या काही तासंवार येऊन ठेपला असताना अद्याप नालेसफाई 30 टक्केच झाली आहे त्यामुळे आठवडाभरात नालेसफाई होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यावर भाजप (BJP) आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी नाराजी व्यक्त करत ज्या ठिकाणी नालेसफाई झाली त्या ठिकाणी पाहणी करून फायदा नाही अनेक ठिकाणी गटारी, नाले अजूनही साफ केलेलं नाहीत असे सांगितले.
हे देखील पाहा -
कल्याण डोंबिवली शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा आणि शहरात पाणी तुंबण्याच्या घटनापासून नागरिकाची सुटका व्हावी यासाठी दरवर्षी प्रमाणे महापालिका प्रशासनाने नालेसफाई सुरू केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 10 प्रभागातील मोठ्या नाल्याची सफाई प्रशासनाकडून सुरु झाली असून छोट्या नाल्याची सफाई पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. यंदा पावसाळयापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.चार मे पासून नालेसफाई सुरू करण्यात आली असली तरी हे काम संथ गतीने चालू आहे.
दरम्यान महापालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांसह नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी हे काम 31 मे र्पयत पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारी वर्गास आखून दिले आहे.तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नालेसफाईबाबत आयुक्त आणि प्रशासनाला लक्ष करत सांगितले की यंदा लवकर पावसाळ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरवात करायला पाहिजे होते, नुसतं पाहणी करून काही होणार नाही ज्या ठिकाणी नालेसफाई झाली त्या ठिकाणी पाहणी केली जाते अनेक गटारी मुख्य नाले अजूनही गाळाने कचऱ्याने भरलेले पाहायला मिळत आहे.
Edited By - Shivani Tichkule
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.