satara, jawali, rain , wall collapsed saam tv
महाराष्ट्र

Satara : भिंतीखाली गाडल्या गेलेल्या महिला मोठ्यानं ओरडल्यानं युवक घराकडं धावले...,

अचानक गावात मोठा आवाज झाल्याने युवकांनी घटनास्थळी धाव घेतली.

ओंकार कदम

Satara News : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे बुद्रुक या गावात अंगावर दगडी भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत तीन महिला (women) देखील गंभीर जखमी (injured) झाल्या आहेत. सर्व जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरु आहे. या जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये कुडाळ भागात देखील गेल्या दहा दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे बऱ्याच भागात छोटे मोठे नुकसान होत आहेत. कुडाळात पावसानं चांगलाच जोर धरला असताना दहा फूट उंचीची दगडी भिंत कोसळली व भिंतीच्या शेजारी बसलेल्या महिला जखमी झाल्या.

यामध्ये प्रभावती मतकर, मुक्ताबाई महामुलकर, कुसुम महामुलकर, पद्मावती महामुलकर यांच्या अंगावर दगडी भिंतीचा भाग कोसळला. त्यामुळे या सर्वजणी भिंतीखाली गाडल्या गेल्या. यातच कुसुम महामुलकर यांचा डोक्यात दगडी पडल्या.

अचानक गावात मोठा आवाज झाल्याने युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाडले गेलेल्या महिलांचा मोठ-मोठ्याने ओरडण्याचा आवाज येत असल्याने युवकांनी भिंतीखाली गाडल्या गेलेल्या तीन महिलांना दगड माती बाजूला काढून मोठ्या शर्तीने बाहेर काढले. मात्र अंगावर सहा ते सात फूट दगड मातीचा मलमा खाली पडलेल्या कुसुम महमूलकर यांना काढण्यात युवकांना वेळ लागला.

त्यांना काही वेळेतच बाहेर काढल्यानंतर त्या गंभीर स्वरूपामध्ये जखमी झाल्या होत्या तसेच बेशुद्ध अवस्थेत होत्या. या सर्व जखमी महिलांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेच कुसुम महामुलकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Team India Playing XI: रोहित In झाल्यानंतर कोण होणार Out? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

Ramdas Athwale : महायुतीत मुख्यमंत्रिपदाबाबत काय चर्चा झाली? रामदास आठवले यांनी सांगितली Inside Story

Maharashtra News Live Updates: दिल्लीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी शरद पवार यांची बैठक होण्याची शक्यता

Junnar Crime : शेतमालाची चोरी करण्यास विरोध; बाजार समितीत तरुणांकडून व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

Chalisgaon Crime : गृहकर्जाची बँकेतून काढली एक लाख ९० हजारांची रोकड; चोरट्यानी संधी साधत लांबविली रोकड

SCROLL FOR NEXT