Kolhapur Rain, Ajaara, Radhanagari dam, panchganga river saam tv
महाराष्ट्र

Rain Hits Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, दाेघे गंभीर; तहसीलदार घटनास्थळी

Radhanagari Dam : आज दुपारी एक वाजता राधानगरी धरणातून 60276 इतका पाण्याचा विसर्ग सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जाेर सुरुच आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यात जून्या मातीच्या घरांच्या पडझड सुरुच आहे. आज (गुरुवार) आजरा तालुक्यातील किणे येथे घराची भिंत काेसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. भिंत काेसळून महिलेचा मृत्यू हाेण्याची ही जिल्ह्यातील दूसरी घटना आहे. (Maharashtra News)

काही दिवसांपुर्वी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात खासबाग मैदानाच्या बाजूची भिंत कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. तसेच एक महिला देखील जखमी झाली हाेती.

सततच्या पावसामुळे (kolhapur) आजरा तालुक्यातील किणे येथे आज घराची भिंत काेसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनीता अर्जुन गुडूळकर असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचे पती अर्जुन गुडूळकर व ननंद वत्सला गुडूळकर हे या घटनेत जखमी झाले आहेत.

भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच घटनास्थळी तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. जखमींवर उपचार करण्याबाबत रुग्णालयात संपर्क साधला.

दरम्यान काेल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत भिंत कोसळून महिलेचा मृत्यू हाेण्याची ही दुसरी घटना आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT