Women Mayors Saam Tv
महाराष्ट्र

Women Mayors: राज्यातील १५ महापालिकांवर 'महिलाराज', कुठे कोण महापौर होणार? वाचा लिस्ट

Women Mayors Maharashtra: राज्यातील २९ महानगर पालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. २९ पैकी १५ महानगर पालिकांवर महिलाराज पाहायला मिळणार आहे. याठिकाणी कोणत्या प्रवर्गातील महिलांना आरक्षण देण्यात आले वाचा...

Priya More

Summary:

  • राज्यातील २९ महानगर पालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली

  • २९ पैकी १५ महानगर पालिकांमध्ये महिलांसाठी आरक्षण देण्यात आले

  • १५ महापालिकांवर महिलाराज पाहायला मिळणार

राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये कोण महापौर होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. राज्यातील २९ पैकी १५ महानगर पालिकांमध्ये महिला महापौर होणार आहे. सगळी मोठी शहरं महिलांच्या हातात देण्यात आली आहेत. राज्यातील १५ महानगरपालिकांमध्ये 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे.

महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे या नियमानुसार राज्यातील १५ महानगर पालिकांवर महिला महापौर होणार आहे. राज्यातील १५ महानगर पालिकांवर महिला राज पाहायला मिळणार आहे. महिलांना मिळालेल्या ५० टक्के आरक्षणामुळे राज्यातील २९ पैकी ४ महानगर पालिकांमध्ये ओबीसी महिला महापौर होणार आहे. ९ महानगर पालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिला महौपार होणार आहे. तर उर्वरीत २ महानगर पालिकांमध्ये एससी महिला महापौर होणार आहे.

कोणत्या महापालिकांवर महिलाराज असणार?

1) जालना- एससी महिला

2) लातूर - एससी महिला

3) जळगाव - ओबीसी महिला

4) चंद्रपूर - ओबीसी महिला

5) अहिल्यानगर - ओबीसी महिला

6) अकोला - ओबीसी महिला

7) पुणे - खुला प्रवर्ग महिला

8) धुळे - खुला प्रवर्ग महिला

9) मुंबई - खुला प्रवर्ग महिला

10) पिंपरी-चिंचवड - खुला प्रवर्ग महिला

11) नवी मुंबई - खुला प्रवर्ग महिला

12) नांदेड - खुला प्रवर्ग महिला

13) मीरा भाईंदर - खुला प्रवर्ग महिला

14) नाशिक - खुला प्रवर्ग महिला

15) नागपूर- खुला प्रवर्ग महिला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Mayor : जळगाव महापालिकेच्या महापौरपदी महिलाराज, ४ महिलांचं नाव चर्चेत; वाचा संपूर्ण

काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या पुतण्याने बायकोला संपवलं, नंतर स्वत:वर झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update : पंढरपुरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

Silver Earrings Design: सिल्वर कानातल्यांचा भलताच ट्रेंड, हे आहेत 5 लेटेस्ट कानातले डिझाईन्स

Accident News : मॉर्निंग वॉकला गेली, पुन्हा घरी परतलीच नाही; कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, देशसेवेचं स्वप्न अपूर्णच राहिलं

SCROLL FOR NEXT