Akola hospital  Saam TV
महाराष्ट्र

Akola News : बाळ CCUमध्ये, आई अचानक झाली बेपत्ता; चार दिवसांनी रुग्णालयाचं टॉयलेट उघडलं अन्...

Akola Hospital News: महिलेने जीवन का संपवलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात एक धक्कादायक बातमी समोर आली. महिलेने रुग्णालयातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चार दिवसांपासून ही महिला बेपत्ता होती. महिलेने जीवन का संपवलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेचं बाळ सीसीयूमध्ये भरती होते. मात्र बाळावर उपचार सुरु असतानाच ही महिला बेपत्ता झाली होती. बाळाला सोडून महिला कुठे गेली याचा कुणालाही पत्ता लागत नव्हता. महिलेचा शोध सुरू होता, पण ती कुठेच सापडली नाही. चार दिवस उलटले तरीही तिचा शोध लागत नव्हता. (Latest News Update)

महिलेच्या घरची मंडळीही चिंतेत होती. रुग्णालयातील एका शौचालयाचे दार बंद असल्याचं आढळून आलं. तिथून दुर्गंधी देखील येत होती. रुग्णालय प्रशासनाला लोकांनी याबाबत कळवलं. रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना पाचारण केलं.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शौचालयाचं दार तोडलं. तेव्हा सारेच हादरले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शौचालयातच या महिलेने आत्महत्या केली होती. चार दिवसांपासून महिलेच्या बाळावर CCU मध्ये उपचार सुरु होते. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दसरा मेळाव्याआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; बड्या नेत्याच्या खांद्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Oil in Belly Button: रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये लावा 'हे' खास तेल; फायदे वाचून तुम्हीही व्हाल चकित

PF Balance WhatsApp : EPFO च्या 'या' सेवेमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा! आता WhatsApp वर मिळणार PF खात्याची माहिती, पण कशी? वाचा...

Diwali Chakli Recipe : पहिल्यांदाच भाजणीची चकली करताय? फॉलो करा स्टेप बाय स्टेप 'ही' रेसिपी

Maharashtra News Live Update: विधानपरिषदेचे उपसभापती सचिन आहीर करणार नव्या घरात प्रवेश

SCROLL FOR NEXT