Nashik News, Money, Police, Crime News, Women Saam TV
महाराष्ट्र

Crime News : खून करुन अपघाताचा रचला बनाव, विम्याचे चार कोटी रुपये लाटले; महिलेसह पाच अटकेत

उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले अधिक तपास करत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- तबरेज शेख

Nashik Crime News : खुन करुन अपघात झाल्याचा बनाव रचून पाच संशयितांनी कट आखत मयत व्यक्तीचे विम्याचे तब्बल चार कोटी रुपये बोगस महिलेला पत्नी म्हणून वारस दाखवत लाटल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच नाशकात उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह (women) पाच संशयितांना रात्री मुंबईनाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

२ स्प्टेंबर २०२१ रोजी रात्री इंदिरा नगर जाॅगिंग ट्रॅक येथे रस्त्याच्या कडेला झाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. दुचाकी बाजुला पडलेली असल्याने पोलिसांनी (police) अपघाताचा संशय व्यक्त करीत गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांच्या तपासात संबंधित व्यक्ती अशोक रमेश भालेराव (वय ४६ रा. देवळाली कॅम्प भगुर रोड) ही असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात ३०४ अ प्रमाणे गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता.

दोन दिवसांपुर्वी मयताच्या भावाने या अपघाताबाबात संशय व्यक्त करत तपास करण्याचे पोलिसांना पत्र दिले होते. ठाण्यात येऊन हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयातून (court) या गुन्ह्याचे कागदपत्र मागून घेत तपास सुरु केला.

यामध्ये विम्याचे ४ कोटी रुपये रजनी उके या महिलेच्या नावावर जमा झाल्याचे तपासात समोर आले. पाेलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेत तिची चौकशी केली. तिने मंगेश सावकार याच्याससह पाच संशयितांबराेबर कट रचल्याचे सांगितले.

पाेलिस पथकाने मंगेश सावकार यास ताब्यात घेत चौकशी केली असता खुन करुन अपघात दाखवत विम्याची रक्कम एकमेकांत वाटप केल्याची माहिती समाेर आली. या प्रकरणी मुख्य संशयित मंगेश बाबुराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी, याच्यांसह आणखी दोघांना अटक केली. सावकारच्या दुचाकीच्या डिक्कीत पिस्टल आणि ६ काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले करत आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

SCROLL FOR NEXT