प्रसूतीनंतर महिलेला व बाळाला झोळीची कावड करुन नेले रुग्णालयात - Saam TV
महाराष्ट्र

प्रसूतीनंतर महिलेला व बाळाला झोळीची कावड करुन नेले रुग्णालयात

खेड तालुक्यातील शेंदुर्ली गावात घरात प्रस्तुती झाल्यानंतर महिलेला आणि बाळाला पुढील उपचारासाठी झोळीत बसवून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती.

रोहिदास गाडगे

जुन्नर : भिमाशंकर Bhimashankar परिसरात पावसाने Rains रस्त्यांची दुरवस्था झालीय तर काही भागात नदी नाले दुथडी भरुन वाहु लागल्याने रस्ते बंद झाले आहेत. अशातच खेड Khed तालुक्यातील शेंदुर्ली गावात घरात प्रस्तुती झाल्यानंतर महिलेला आणि बाळाला पुढील उपचारासाठी झोळीत बसवून नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली होती. Women and new born child taken to hospital

शेदुर्ली गावाच्या डोंगरमाथ्यावर वास्तव्यास असणारे शांताराम मेमाणे यांच्या पत्नीची प्रस्तुती घरात झाली. दरम्यान प्रस्तुती झालेल्या महिलेला अचानक त्रास होऊ लागला. मात्र, पुढील उपचारासाठी रुग्णालयात जाण्यासाठी कुठलेच साधन उपलब्ध नसल्याने आणि पाऊस वारा असल्याने नातेवाईकांनी झोळीची कावड तयार करत महिलेला रुग्णालयात दाखल केले.

सध्या महिला आणि बाळावर डेहेणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून दोघेही सुखरुप आहेत. पावसाच्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. अशातच डोंगरमाथ्यांवर रहाणाऱ्या नागरिकांना आजही आपतकालीन वेळेत अत्यावश्यक सेवा मिळविण्यासाठी असाही संघर्ष करावा लागतो हेच खेदानं सांगावं लागतंय.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT