Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola News: धक्कादायक! अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह, घातपाताची शक्यता

Akola News Today: दहिगाव गावंडे शेतशिवारात एका चाळीस वर्षीय महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

अॅड. जयेश गावंडे

Akola Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता अकोल्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहिगाव गावंडे शेतशिवारात एका चाळीस वर्षीय महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

नेमकं प्रकरण काय?

अकोल्यातील (Akola) बोरगाव मंजू पोलीस (Police) स्टेशनच्या हद्दीतील दहिगाव गावंडे शेतशिवारात एका चाळीस वर्षीय महिलेचा अर्धवट अवस्थेत जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटने प्रकरणी बोरगाव पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. (Akola News)

सदर महिला ही विधवा असून तिला दोन मुलं आहेत. गेल्या काही वर्षांपासून ती आपल्या माहेरी म्हणजेच दहिगाव गावंडे येथे राहत होती. काही दिवसांपासून ती गावातून बेपत्ता होती. दरम्यान, दहिगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात तिचा मृतदेह आढळून आला.

मृतदेहावर काटेरी झुडूप टाकलेली होती. मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. दरम्यान घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळताच पोलिसानी घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सरोपचार रुग्णालयात पाठवला आहे. सदर महिलेचा घातपात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा अधिक तपास बोरगाव पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT