BIG BREAKING | खराब रस्त्यामुळे महिलेचा बळी; विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना जाग येणार?, पाहा व्हिडिओ Saam Tv
महाराष्ट्र

BIG BREAKING | खराब रस्त्यामुळे महिलेचा बळी; विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना जाग येणार?, पाहा व्हिडिओ

बीडमध्ये चिखलमय रस्त्यामुळे महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये चिखलमय रस्त्यामुळे महिलेचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छातीत दुखू लागल्याने, एका 40 वर्षीय महिलेला हॉस्पिटलमध्ये घेवून जात असताना, चिखलाच्या रस्त्यामध्ये गाडी फसली. बराच वेळ प्रयत्न करून देखील गाडी निघाली नाही. यातच उपचाराअभावी महिलाचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेने 40 वर्षीय महिलेचा बळी गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

बीडच्या गेवराई तालुक्यातील चकलांबा- चोरपुरी रस्त्यावर काल ही घटना घडली आहे. आशाबाई उमाजी गंडे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रस्ता व्यवस्थित असता तर माझी बहीण आज वाचली असती, असे मयत महिलेचा भाऊ राहुल गंडे यांनी सांगितले आहे. लोकप्रतिनिधींकडून विकास कामांचा दिंडोरा पिटविला जात असतानाच, गेवराई तालुक्यातील चकलांबा पासून 4 किलोमीटर अंतरावर चोरपुरी हे डोंगरदऱ्यात वसलेले गाव आहे.

पहा व्हिडिओ-

या गावात जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बघून, तर चोरपुरी येथील ग्रामस्थ दळणवळण कशाप्रकारे करतात. हा प्रश्न नाही पडला तर नवलच. चारचाकी, दुचाकी सोडाच, परंतु पायी चालणे देखील ग्रामस्थांची कसोटीच असते. गावात कोणी आजारी पडले, महिलांची प्रसुती यावेळी ग्रामस्थांना देवाच्या भरोसे रहावे लागते. स्वातंत्र्याची 75 वर्षे लोटली असताना, देखील या गावाला अद्यापही रस्ता झाला नाही.

हे मोठे दुर्दैव आहे. गावाला रस्ता कधी मिळणार ? आमचं जगणं सुखकर कधी होणार? असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला आहे. काल या गावातील आशाबाई उमाजी गंडे या अपंग महिलेच्या छातीत दुखू लागल्याने अत्यवस्थ वाटू लागले. त्यामुळे आशाबाई यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी चारचाकी गाडी घेऊन निघाली. मात्र, वाटेतच चिखलात हि गाडी फसली. काळी माती त्यात चिखल चालकाने अथक परिश्रम करुन, देखील गाडी काही केल्या निघत नव्हती.

तर आशाबाई यांना वाटेत रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी कुठला पर्याय देखील उपलब्ध नव्हता. दरम्यान वेळेवर उपचार मिळू न शकल्याने आशाबाई यांचा गाडीतच मृत्यू झाला. सायंकाळी या महिलेचे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विकासाच्या गप्पा मारणारे, निवडणुका जवळ आले की आश्वासनांची खैरात करणाऱ्या पुढाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे. तसेच तात्काळ गावाला जोडणारा पक्का रस्ता तयार करा. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT