- अमर घटारे
Amravati News : आई या शब्दातच सारं काही समावून गेले आहे. हे शब्द कानावर पडावेत अशी इच्छा प्रत्येक महिलेची असते. असेच स्वप्न पाहिलेल्या मेळघाटातील (melghat) एका महिलेचे नूकतेच पूर्ण झाले असून महिलेने तब्बल ४ बालकांना जन्म दिला आहे. यामुळे महिलेच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (Maharashtra News)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील धारणी उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली. या महिलेने १ नव्हे तर ४ बालकांना जन्म दिला. या महिलेची आणि सर्व बालकांची प्रकृती देखील स्थिर आहे असे रुग्णालयातून माहिती देण्यात आली.
धारणी उपजिल्हा रुग्णालयातील (dharni primary health centre) परिचारिका साम टीव्हीशी बाेलताना म्हणाल्या चारही नवजात बालकं या मुली आहेत. या बालकांचे वजन कमी (१.२ किलो) भरल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुनी ग्रामस्थ आनंदले
या महिलेची प्रसुती डाॅ. प्रिती शेंद्रे व परिचारिका तेजस्विनी गाेरे, नंदा शिरसट व त्यांच्या टीमने केल्याची माहिती दुनी ग्रामस्थांनी दिली. तर डाॅ. जावरकर, डाॅ. अश्विन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांवर उपचार सुरु आहेत.
महिलेने ४ बालकांना जन्म दिल्याची मेळघाटसह अमरावती जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे ही या घटनेकडे कुतूहलाने पाहिले जात आहे. तर गावात एकाच वेळी चार मुलींचा जन्म झाल्याने दुनी ग्रामस्थांत आनंदी वातावरण आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.