Satara female doctor death case update saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! साताऱ्यातील महिला डॉक्टरनं आयुष्याचा दोर कापला; हॉटेलमधील खोलीत आढळला मृतदेह

Satara Phaltan Sub-District Hospital Doctor Dies: फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

  • साताऱ्यातील धक्कादायक घटना

  • फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरची आत्महत्या

  • काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या

साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. उपजिल्हा रूग्णालयातील महिला डॉक्टरने आयुष्य संपवलं. हॉटेलमध्ये गळफास घेऊन डॉक्टर महिलेनं आत्महत्या केली असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपासून महिला डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. दरम्यान, महिलेनं टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

महिला डॉक्टर या फलटण (जि. सातारा) येथील उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून त्या पोलीस विभाग आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू होती.

महिला डॉक्टर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे, 'माझ्य़ावर अन्याय होत आहे. मी आत्महत्या करेन', अशी तक्रारही दाखल केली होती. तक्रार दाखल करूनही कारवाई झालेली नव्हती. याच मानसिक तणावाखाली येऊन त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. महिला डॉक्टर यांनी हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्याकेली.

काल रात्री हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं असल्याची माहिती आहे. या घटनेने फलटण उपजिल्हा रुग्णालयासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urinary Tract Infection: पावसाळ्यात वारंवार युरीन इन्फेक्शन होतंय? हा 1 देसी नुस्खा करेल तुमचा बचाव

Uddhav Thackeray : "सरकार तरुणाईला घाबरत आहे.." उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, २६ जुलैच्या मोर्चाची केली घोषणा

Spicy Cheesy Maggi Recipe : साध्या मॅगीला द्या लसणाचा तडका, रेसिपीची चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ शहादा शहर कडक बंद

आधार कार्ड हरवलंय? मग घरबसल्या २ मिनिटांत नवीन आधार करा डाऊनलोड

SCROLL FOR NEXT