Crime Saam tv
महाराष्ट्र

पत्नीवर गावठी कट्ट्यातून तीन राऊंड गोळीबार; आरोपी पती फरार, नांदेड हादरले

Nanded Loha crime News : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर गावठी कट्ट्यातून तीन राऊंड गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. जखमी महिलेवर उपचार सुरू असून आरोपी पती फरार आहे.

Namdeo Kumbhar

संजय सूर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्याच पत्नीवर विनापरवाना गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार केला. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, विशालने रागाच्या भरात घरात असलेला गावठी कट्टा काढून पत्नी अर्चनावर सलग तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारातील एक गोळी अर्चना यांच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी थेट पाठीत घुसली. गोळी लागताच अर्चना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अर्चना यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षकांकडून घटनास्थळाची पाहणी

या घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन आणि लोहा स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण करण्यात आले होते. या पथकांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत.

आरोपी पतीचा गुन्हेगारी रेकॉर्ड

फरार झालेला आरोपी विशाल जाधव याचा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. त्याच्यावर यापूर्वी मे २०२५ मध्ये एका पेट्रोल पंप लुटीचा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशालच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके विविध भागात रवाना करण्यात आली असून, त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. कौटुंबिक वादातून थेट भरवस्तीत आणि तेही गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्यामुळे लोहा शहरात सध्या नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहा पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

SCROLL FOR NEXT