लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

लग्नाच्या सहा महिन्यातच तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर सोलापूर तालुक्यातील येथील अकोलेकाटी येथील शिवकुंज बाळासाहेब कुंभार या वय 26 वर्षीय तरुणाचा आज पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : उत्तर सोलापूर Solapur तालुक्यातील येथील अकोलेकाटी येथील शिवकुंज बाळासाहेब कुंभार या वय 26 वर्षीय तरुणाचा आज पहाटे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.

मागच्या 15 फेब्रुवारीला नुकतंच शिवकुंज विवाहबंधनात अडकला होता. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यातच अकाली मृत्यूमुळे 'अर्ध्यावरति डाव मोडला....अधुरी एक कहाणी...!' अशी अवस्था झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे देखील पहा-

मनमिळाऊ, निर्व्यसनी असणारा शिवकुंज शिवभक्त होता. श्रावण आरंभाच्या पूर्वसंधेला श्रीक्षेत्र रामलिंग मंदाराचे दर्शन घेऊन आला होता. शिवकुंजच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबियांना मित्रमंडळी, नातेवाईकांना धक्का बसला आहे.

त्याच्या मृत्यूने अकोलेकाटी शोककळा पसरली आहे. शिवकुंज पश्चात आई , वडील ,पत्नी ,लहान भाऊ आहेत. शिवकुंज हा सोलापूरमधील गितांजली पेंट शोरुम मध्ये एशियन पेंटचे मार्केटिंचे काम पाहत होता. धार्मिकवृत्ती असणाऱ्या शिवकुंजला पर्यटनाची भारीआवड असल्याने जुलैमध्ये बदामी (कर्नाटक), आॕगस्टमध्ये दांडेली (कर्नाटक) आणि रविवारी रामलिंगची सफर करुन आला होता.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सीएसएमटी ते खोपोली जाणाऱ्या लोकलच्या पंख्यामधून अचानक निघू लागला धूर

Mumbai Crime : मुंबईत डबेवाल्याची सायकल चोरी; ११ डबे घेऊन चोरांचा ‘लंच ब्रेक’? चोरट्याचा फोटो व्हायरल

Maharashtra Politics: गद्दारांशी युती नको, ठाकरेंचं फर्मान, ठाकरे-शिंदेसेना युतीवरून वादंग

Fact Check: बिबट्यांच्या जुन्नरमध्ये वाघाचा धुमाकूळ? वस्त्यांमध्ये फिरतोय आता पट्टेरी वाघ?

Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

SCROLL FOR NEXT