कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने माझ्यासोबत समाज्याच्या अपेक्षा वाढल्या - राजू पाटील  SaamTv
महाराष्ट्र

कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने माझ्यासोबत समाजाच्या अपेक्षा वाढल्या - राजू पाटील

नवी मुंबई विमानतळ नामांतराचा विषय आता ते जोमाने मांडतील असा विश्वासही राजू पाटील यांनी व्यक्त केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रदीप भणगे

डोंबिवली : खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने नवी मुबंई विमानतळ नामांतराच्या विषयामध्ये समाजाला नक्कीच फायदा होईल. तसेच आगरी कोळी समाजातील हे पहिलेच केंद्रीय मंत्रिपद असल्याने कपिल पाटील यांच्या कार्याबरोबरच हा समाजाचा देखील गौरव असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केले. With Kapil Patil getting the post of Union Minister, the expectations of the society increased with me - Raju Patil

हे देखील पहा -

तसेच कपिल पाटील यांना केंद्रीयमंत्री पद मिळाल्याने त्यांच्याकडून माझ्यासोबत समाज्याच्या देखील अपेक्षा वाढल्या असून नवी मुंबई विमानतळ नामांतराचा विषय आता ते जोमाने मांडतील असा विश्वासही राजू पाटील यांनी व्यक्त केला.

आज मोदी सरकारचा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार व फेरबदल झाला. या फेरबदलामध्ये महाराष्ट्र राज्यातून चार जणांची निवड झाली. कोकणातील भाजपच्या दोन खासदारांना केंद्रीय मंत्रीपद मिळाले. खासदार नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील या दोन्ही नेत्यांना मंत्रिपद मिळाल्याने कार्यकर्त्यांनी मिठाई वाटत फटाके वाजवत एकच जल्लोष केला.

खासदार कपिल पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने ठाणे, रायगड, पालघर, जिल्यातील स्थानिक भूमिपुत्र आगरी, कोळी,कुणबी, कराडी समाजातील नागरिकांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आगरी कोळी समाजातील पहिल्याच नेत्याला केंदीय मंत्रिपद मिळाले आहे. आतापर्यंत राज्यातील मंत्रीपदे या समाजातील नेत्यांनी भूषवली आहेत. मात्र केंद्रीय मंत्रिपद हे पाहिल्यांदाच मिळाल्याने समाजात आनंद व्यक्त केला जातोय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तरूणीच्या गळ्यावरून चाकू फिरवला; घरात रक्ताचा सडा, बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं, कारण काय?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

New Rule: LPG ते पेन्शन; १ डिसेंबरपासून महत्त्वाच्या नियमात बदल होणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर'च्या कमाईत घसरण, रितेश देशमुखच्या 'मस्ती 4'नं किती कमावले?

Sabudana Chivda Recipe: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT