डॉ.भागवत कराड यांच्या मूळ गावी जल्लोष; ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव

अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे रहिवासी असलेले डॉ.भागवत कराड यांचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथविधी संपन्न झाला.
डॉ.भागवत कराड यांच्या मूळ गावी जल्लोष; ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव
डॉ.भागवत कराड यांच्या मूळ गावी जल्लोष; ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सवदीपक क्षीरसागर, SaamTv
Published On

दीपक क्षीरसागर

लातूर : मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांची वर्णी लागली. यामध्ये लातूर जिल्ह्यातील चिखली गावचे सुपुत्र डॉ.भागवत कराड यांचा देखील समावेश आहे. आज केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे रहिवासी असलेले डॉ.भागवत कराड यांचा केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथविधी संपन्न झाला. Celebration in the hometown of Dr. Bhagwat Karad

या शपथविधीनंतर भागवत यांच्या मूळ चिखली गावात त्यांचे नातेवाईक, ग्रामस्थ, नागरिक व युवकांनी हालकी ढोल ताशा वाजवत आनंद साजरा केला. तर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. यावेळी गावकऱ्यांचा चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. गावात दूरचित्रवाणीवर शपथविधीचा क्षण पाहताना अनेक जण भावुक झाले होते.

डॉ.भागवत कराड यांच्या मूळ गावी जल्लोष; ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव
हे 43 मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ; वाचा सविस्तर

डॉ.भागवत कराड यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली होती. डॉ.भागवत यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण याच चिखली गावात झालं. भागवत यांनी स्वर्गीय केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.

संकट असो वा अडचणीच्या काळात खंबीरपणे मुंडे यांच्या सोबत एकनिष्ठ राहून काम केले आज त्याच सार्थक झाल्याची भावना त्यांच्या गावकऱ्यांनी व्यक्त केली. हा बहुमान गावाचा नसून महाराष्ट्र राज्याचा आहे, अश्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. गावात आज दिवाळी सारखं वातावरण व आनंदोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे भागवत यांच्या गावातील मंडळींनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com