Ravi Rana Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अशोक चव्हाणांसोबत विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा

Ashok Chavan News : अशोक चव्हाण हे अनेक दिवसापासून भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत, असं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा 'हात' धरला आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या महिनाभरात हा तिसरा मोठा धक्का बसला आहे. आधी मुंबईतून माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचीही चिंता इथेच कमी होत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या 'आगे आगे देखो होता है क्या?' या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आता काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाला पडला आहे. त्यातच आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशोक चव्हाण हे अनेक दिवसापासून भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात एक मोठा स्फोट काँग्रेसमध्ये होईल, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. (Latest Marathi News)

अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार आहेत. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता असले तरी त्यांचं काय सुरू आहे ते मला माहीत आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा देखील रवी राणा यांनी केला आहे.

मात्र विजय वडेट्टीवार यांनी हे सर्व दावे खोडून काढले आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठे ही जाणार नसल्याची विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

भविष्यात मोदींनाही देशात तोंड लपवून फिरावं लागेल

माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी पंतप्रधान मोदींवर देखील हल्लाबोल केला. भविष्यात मोदींना देशात तोंड लपवून फिरावं लागेल, असं ते म्हणाले. BJP ने महाराष्ट्रात शहिदांच्या कुटुंबाचा अपमान केल्याच्या निषेदर्थ आंदोलनं सुरू केलं होतं. काँग्रेस मुक्त भारत ही घोषणा आता BJP ने बंद करावी कारण ते आता काँग्रेस शुद्धीकरणाचं काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राला खड्ड्यात नेऊन सोडलंय. BJP आता 200 च्या पुढेही जाणार नाही, असा विश्वास देखील यावेळी राऊतांनी व्यक्त केला.

अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार?

अशोक चव्हाण यांचा भाजप पक्षप्रवेश होताच कोणत्याही क्षणी ते भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतून जाहीर होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज उद्या भरतील अशी देखील माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT